Gram Panchayat Election: राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; १८ सप्टेंबरला मतदान, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 12, 2022 | 18:16 IST

Gram Panchayat election 2022: राज्य निवडणूक आोगाने राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Maharashtra Election Commission annouced 608 Gram Panchayat election 2022 read full schedule in marathi
Gram Panchayat Election: राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; १८ सप्टेंबरला मतदान, पाहा संपूर्ण वेळापत्रक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर 
  • १८ सप्टेंबर रोजी होणार मतदान

Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीची मतमोजणी १९ सप्टेंबर २०२२ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. (Maharashtra Election Commission announced 608 Gram Panchayat election 2022 read the full schedule in marathi)

सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य विवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अधिक वाचा : Pankaja Munde: कॉलेजमध्ये तुम्हाला कधी कुणी प्रपोज केलंय का मॅडम?, पाहा पंकज मुंडेंनी काय दिलं उत्तर

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.

अधिक वाचा : "....म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल" : पंकजा मुंडे

मतदान १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. 

मतमोजणी १९ सप्टेंबर २०२२ रोजी होईल.

समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:

नंदुरबार: शहादा- ७४ व नंदुरबार- ७५. धुळे: शिरपूर- ३३. जळगाव: चोपडा- ११ व यावल- ०२. बुलढाणा: जळगाव (जामोद)- ०१, संग्रामपूर- ०१, नांदुरा ०१, चिखली- ०३ व लोणार- ०२. अकोला: अकोट- ०७ व बाळापूर ०१. वाशीम : कारंजा- ०४. अमरावती धारणी- ०१, तिवसा- ०४, अमरावती- ०१ व चांदुर रेल्वे- ०१. यवतमाळ : बाभुळगाव- ०२, कळंब- ०२, यवतमाळ- ०३, महागाव - ०१. आर्णी- ०४, घाटंजी - ०६, केळापूर २५. राळेगाव- ११, मोरेगाव- ११ व झरी जामणी- ०८. नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- ०१. मुदखेड - ०३, नायगाव (खैरगाव)- ०४, लोहा- ०५, कंधार- ०४, मुखेड- ०५, व देगलूर - ०१. हिंगोली : (औंढा नागनाथ)- ०६. परभणी: जिंतूर- ०१ व पालम - ०४. नाशिक: कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक १७. पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ०५ व भोर- ०२. अहमदनगर: अकोले- ४५. लातूर: अहमदपूर ०१. सातारा: वाई - ०१ व सातारा- ०८. व कोल्हापूर: कागल- ०१. एकूण ६०८.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी