महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल 2019: कोणाचा झाला विजय तर कोणाला बसला पराभवाचा धक्का

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 25, 2019 | 17:13 IST

Maharashtra election Result (महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल) 2019 LIVE: 288 विधानसभा मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला. या निकालानंतर कोणाचा विजय झाला आणि कोणाचा विजय जाणून घ्या.

VidhanSabha Election 2019
महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल 2019   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • 288 विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतमोजणी
 • राज्यात कोणाची सत्ता येणार याचा फैसला आज ठरेल

महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल( Maharashtra Election Result): 288 विधानसभा मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला. या मतमोजणीनंतर कोणत्या नेत्यांना पुन्हा संधी मिळाली तर कोणाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. २१ ऑक्टोबरला या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्याआधी सर्वच नेत्यांनी प्रचारसभा दौरे केले होते. काही वेळातच विधानसभा निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. या  निकालाचे सर्व अपडेट्स जाणून घेऊया.

महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल ( Maharashtra Election Result) 2019 LIVE:

 1. भाजप मुख्यालयात मोदी- शहा यांच्या नेतृत्त्वात चर्चा सुरू, दोन्ही राज्यात सत्तास्थापनेबाबत भाजप नेत्यांमध्ये चर्चेला सुरूवात, महाराष्ट्र, हरियाणा निकालानंतर भाजप संसदीय बोर्डाची बैठक, 
 2. राष्ट्रवादी काँग्रेसनं बीड जिल्ह्यात मुसंडी मारली. परळीनंतर बीड मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय,राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर विजयी, संदीप यांचा १७८६ मतांनी विजय
 3. मी उद्धव यांच्याशी फोनवर बोललो आहे, मी उद्धव यांचं बोलणं ऐकलं, महायुतीचंच सरकार येणार, 
 4. सहा मंत्र्यांच्या पराभवाचा मीमांसा करू, आज जिंकल्याचा आनंद घेऊ द्या, उद्यापासून पराभवाची मीमांसा, आमचं जे ठरलंय, त्यानुसारच पुढे जाऊ- फडणवीस
 5. आम्हाला बंडखोरांमुळे फटका बसला, शरद पवारांनी आनंदित होण्याची काही गरज नाही, सत्ता आम्हीच स्थापन करणार यात शंका नाही- सीएम
 6. योग्य वेळी सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील, पंकजा मुंडेंच्या पराभवाचं आम्ही विश्लेषण करू, उद्धव यांचं म्हणणं नीट ऐकलं, ठरलंय त्याप्रमाणे पुढे जाऊ- मुख्यमंत्री
 7. काही ठिकाणी जागा कमी- जास्त झाल्या पण कामगिरी चांगली, मतांच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली- सीएम 
 8. उदयनराजे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव धक्कादायक, सातारा लोकसभेचा निकाल धक्कादायक- सीएम
 9. १६४ जागा लढूनही आम्ही २६ टक्के मतं मिळाली. मतांच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली, निवडणुकीत जनतेचं सर्वांत मोठं समर्थन भाजपला मिळालं- सीएम
 10. महायुतीचे घटकपक्ष आणि उद्धव ठाकरे यांचेही आभार, ही वेळ विजय साजरा करायची आहे, विश्लेषणाची नाही, यावेळी आमचा स्ट्राईक रेट हा ७० टक्के आहे- फडणवीस
 11. पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार आहे- मुख्यमंत्री
 12. पुढचं सरकार महायुतीचं होणार, यात शंका नाही, जनतेनं महायुतीला कौल दिला, मी आभार मानतो- मुख्यमंत्री
 13. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
 14. महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करावं लागेल, सत्तास्थापनेची घाई नाही, पण सर्व पर्याय खुले- उद्धव ठाकरे, विधानसभेच्या निकालानंतर सेनेचा भाजपला पहिला फटका
 15. मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा, भाजपनं अडचण व्यक्त केल्यामुळे कमी जागा लढवल्या- ठाकरे 
 16. जनादेश सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणारा, भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेणार नाही,  सरकार स्थापन करतील एवढ्या युतीच्या जागा- ठाकरे
 17. विधानसभेसाठी फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्यूला ठरला होता, उद्धव ठाकरेंकडन महाराष्ट्राच्या जनतेचे आभार, जनतेच्या आशीर्वादासमोर नतमस्तक, सरकार स्थापन करतील एवढ्या युतीच्या जागा- ठाकरे. 
 18. महायुतीला सरकार स्थापन करता येणार, महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करावं लागेल- ठाकरे
 19.  उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
 20. चिखलीमधून भाजपच्या श्वेता महाले विजयी, श्वेता महाले यांचा ६ हजार ८५१ मतांनी विजय, चिखलीतून काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांचा पराभव, 
 21. अर्जुनी मोरगावमधून माजी मंत्री राजकुमाार बडोलेंचा पराभव, राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरेंचा विजय
 22. परळी, आष्टीनंतर बीडमध्येही महायुतीला धक्का बसणार? २२ व्या फेरीत जयदत्त क्षीरसागर ४ हजार मतांनी पिछाडीवर, बीडमध्ये पुतण्या काकांना शह देण्याच्या तयारीत 
 23. पिंपरीमधून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विजयी, शिरूरमधून काँग्रेसचे अशोक पवार विजयी, भोसरीमधून भाजपचे महेश लांडगे यांचा विजय, ७७ हजार ३७९ मतांनी महेश लांडगेंचा विजय, अरमोरीतून भाजपचे कृष्णा गजबेंचा २१,५५० मतांनी विजय, काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा पराभव, काँग्रेसचे धोटे २ हजार ४४१ मतांनी विजयी, राजुरामधून भाजपचे संजय धोटे पराभूत, 
 24. दिंडोरीमधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ विजयी, दिग्रसमधून शिवसेनेचे संजय राठोड यांचा विजय, संजय राठोड यांचा ६३ हजार ६०७ मतांनी विजय, 
 25. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन अखेर धावलं, मनसे उमेदवार प्रमोद पाटलांचा दणदणीत विजय, प्रमोद पाटील ५ हजारहून अधिक मतांनी विजयी,  शिवसेना उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव, 
 26. चंदगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील विजयी, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांचा पराभव, काँग्रेसचे सुभाष धोटे २ हजार ४४१ मतांनी विजयी, राजुरामधून भाजपचे संजय धोटे पराभूत, चांदवडमधून भाजपचे राहुल अहेर २८,७०० मतांंनी विजयी, 
 27. मलबारहिलमधून भाजपचे मंगलप्रभात लोढा विजयी, लोढांकडून काँग्रेसच्या हिरा देवासी यांचा पराभव
 28. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी, आदित्य ठाकरे तब्बल ६७ हजार ६७२ मतांनी विजयी. राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांचा दारूण पराभव, पहिल्याच निवडणुकीत आदित्य यांचा मोठा विजय
 29. अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा विजय, गोरेगावमधून भाजपच्या विद्या ठाकूर विजयी, अंधेरी पश्चिममधून भाजपचे अमित साटम यांचा विजय, 
 30. सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव, राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांकडून उदयनराजे पराभूत
 31. सांगोल्यात गणपतराव देशमुखांचा नातू अनिकेत देशमुख पराभूत, शिवसेनेचे शहाजीबापू पाटील ७११ मतांनी विजयी, शेकापचा पारंपरिक ५५ वर्षांचा मतदारसंघ शिवसेनेकडे, 
 32. इंदापुरात भाजपला सर्वांत मोठा धक्का, काँग्रेसमधून भाजपत आलेले हर्षवर्धन पाटलांचा पराभव, राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंकडून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव, 
 33. मुक्ताईनगरमधून भाजपच्या रोहिणी खडसे पराभूत, मुक्ताईनगरातून खडसेंच्या कन्या रोहणी खडसेही पराभूत, रोहिणी यांचा १९८७ मतांनी पराभूत
 34. गोंदियात भाजपच्या गोपाल अग्रवाल यांचा पराभव, बंडखोर विनोद अग्रवालांकडून गोपाल अग्रवाल पराभूत, आर्वीतून भाजपचे दादाराव केचे विजयी,श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या अदिती ठाकरे विजयी, सेनेच्या विनोद घोसाळकरांचा ३८,७८३ मतांनी पराभव, 
 35. सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी, केसरकरांकडून अपक्ष उमेदवार राजन तेलींचा पराभव, १३ हजार ९४१ मतांनी दीपक केसरकर यांचा विजय
 36. तिरोडा मतदारसंघातून भाजपचे विजय रहांगडले विजयी, २५ हजार ५०८ मतांनी विजय रहांगडलेंचा विजय, राष्ट्रवादीच्या रविकांत बोपचे यांचा पराभव, 
 37. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धसांचा आष्टीमध्ये विजय, बाळासाहेब आजबे तब्बल २५ हजारांनी विजयी
 38. महाराष्ट्राच्या जनतेनं आयाराम उमेदवारांना स्पष्ट लाथाडलं, एकूण ३५ आयारामांपैकी तब्बल १९ आयरामांचा दारूण पराभव, सेनेच्या ११ तर भाजपच्या ८ आयात उमेदवारांचा पराभव
 39. मुख्यमंत्र्यांचे माजी सहकारी अभिमन्यू पवार विजयाच्या दिशेनं, २९ व्या फेरीअखेर अभिमन्यू पवार २५ हजार मतांनी पुढे, बसवराज पाटलांविरूद्धच्या लढाईत निर्णायक आघाडी
 40. अचलपूरमधून चौथ्यांदा बच्चू कडू यांचा विजय, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर विजयी, शाहुवाडीत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे विजयी,  शिवसेनेच्या सत्यजित पाटलांचा कोरेंकडून पराभव
 41. धारावीतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय, ११ हजार ८२२ मतांनी वर्षा गायकवाड यांचा विजय
 42. साकोलीमध्ये काँग्रेस- भाजपत काँटे की टक्कर, नाना पटोले- परिणय फुके यांच्यात चुरस, १३ व्या फेरीनंतंर नाना पटोले ११२१ मतांनी आघाडीवर
 43. सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी, प्रणिती शिंदेंकडून दिलीप माने यांचा पराभव, शिवसेनेत गेलेल्या मानेंना सोलापूरकरांनी नाकारलं.१२ हजार ७१७ मतांनी प्रणिती शिंदे यांचा विजय
 44. राहुरीतून शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव जवळपास निश्चित, श्रीरामपूरमधून शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे पराभूत, भाजपचे पक्षांतर केलेले वैभव पिचड यांचा पराभव
 45. संध्याकाळी ५.३० वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, विधानसभा निकालाबाबत उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार
 46. परळीच्या जनतेनं अभूतपूर्व प्रेम दिलं, घरातल्या माणसाचा पराभव झाला याची खंत वाटते, जो विश्वास दाखवला त्यासाठी पात्र झालो याचा आनंद, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया 
 47. तासगाव सुमन पाटील विजयी, कसबा मुक्ता टिळक विजयी, नवापूर शिरीषकुमार नाईक विजयी, मेळघाट राजकुमार पटेल विजयी, सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख विजयी, संगमनेर बाळासाहेब थोरात विजयी, विक्रोळी सुनील राऊत विजयी, शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील विजयी, जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील विजयी, बागलाण दिलीप बोरसे विजयी, अमळनेर अनिल पाटील विजयी, कोपरी एकनाथ शिंदे विजयी, प्रताप सरनाईक विजयी, हडपसर चेतन तुपे विजयी, 
 48. कुर्ला मंगेश कुडाळकर विजयी, बोरिवलीतून सुनील राणे विजयी, शिंदखेडा जयकुमार रावल विजयी, माढा बबनराव शिंदे विजयी, पलूस विश्वजित कदम विजयी, बारामतीत अजित पवार विजयी, भोकर अशोक चव्हाण विजयी, बेलापूर मंदा म्हात्रे विजयी, पालघर श्रीनिवास वनगा विजयी, नंदुरबार विजयकुमार गावित विजयी, जामनेर गिरीश महाजन विजयी, घाटकोपर पराग शहा विजयी, शिवडी अजय चौधरी विजयी
 49. वरळीतून आदित्य ठाकरे ५२ हजार मतांनी आघाडीवर
 50. भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांचा विजय, शिवसेनेत प्रवेश करूनही दिलीप सोपल पराभूत, बार्शीमध्ये दिलीप सोपल यांचाही मोठा पराभव
 51. देगलूरमधून काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी. डोंबिवलीत भाजपचे रविंद्र चव्हाण तिसऱ्यांदा विजयी
 52. आतापर्यंत पाच विद्यमान मंत्र्यांचा धक्कादायक पराभव, पंकजा मुंडे, राम शिंदे, शिवतारे, भेगडे, खोतकर पराभूत
 53. बविआचे हितेंद्र ठाकूर विजयी, बोइसर, नालासोपारात आघाडी, धुळे शहरात एमआयएमचा उमेदवार विजयी. गोटेंचा पराभव. चंदगड, मुर्तीजापुरात वंचितच्या उमेदवारांना मोठी आघाडी. 
 54. कारागृहातून निवडणूक लढवणारे रत्नाकर गुट्टे विजयी, रत्नाकर गुट्टेंचा तब्बल १८ हजार मतांनी विजय, शिवसेनेच्या विशाल कदम यांचा गुट्टेंकडून दारूण पराभव
 55. बारामतीत अजित पवार तब्बल १ लाख ६२ हजारांनी विजयी
 56. माळशिरसमध्ये ऊसतोड कामगाराचा मुलगा विजयी, भाजपच्य राम सातपुतेंचा मोठा विजय
 57. मुरबाड- किसन कथोरे १ लाख ७२ हजार मतांनी विजयी
 58. वाशिम कारंजामधून भाजपचे राजेंद्र पाटणी विजयी, राजेंद्र पाटणी २२ हजार मतांनी विजयी. 
 59. राज्यात महाआघाडीचं दणदणीत शतक साजरं, महायुतीच्या जागांमध्ये घसरण सुरूच, काँग्रेस ४५ आणि राष्ट्रवादी ५५ जागा मिळण्याची शक्यता
 60. साताराच्या गादीबद्दल सर्वांना आदर, व्यापक स्वरूपात नव्या पिढीला सहभागी करून घेणार- पवार
 61. साताऱ्यात जाऊन जनतेचे आभार मानणार, साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव- पवार
 62. सत्ता जाते, सत्ता येते, पण जमिनीवर पाय ठेवावे लागतात, पक्षांतरामुळे भाजपला धडा शिकवला, पक्षांतराला लोकांनी पसंती दाखवली नाही- पवार
 63. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडला नाही- पवार. राज्यात पवारांच्या झंझावती प्रचाराला मोठं यश
 64. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापसाठी जनतेनं जो निर्णय दिला तो मोठ्या मनानं स्विकारतो- पवार
 65. २२० च्या पार हे लोकांनी स्विकारलं नाही- शरद पवार
 66. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद
 67. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विजयी, संगमनेरमधून थोरात यांचा ६२०० मतांनी विजय
 68. वांद्रे पूर्वमधून महापौर महाडेश्वर यांचा पराभव, काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी, बुलडाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड विजयी
 69. माहिममधून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी. सरवणकरांकडून मनसेच्या संदीप देशपांडेंचा पराभव. वाशिममधून भाजपचे लखन मलिक विजयी. लखन मलिक यांचा १० हजार मतांनी विजय
 70. बुलडाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड विजयी, मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश एकडे विजयी. मलकापूरमध्ये भाजपला धक्का, संचेतींचा पराभव, मेहकर मतदारसंघात सेनेचे संजय रायमुलकर विजयी.
 71. उद्धव ठाकरेंवरील टीका हर्षवर्धन जाधवांना भोवली? कन्नडमध्ये दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव पराभूत, शिवसेनेचे उदयसिंह राजपूत यांचा दणदणीत विजय
 72. पालघर विधानसभा मतदारसंघात भगवा फडकला. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा विजय. काँग्रेसचे योगेश नाम यांचा दारूण पराभव. वाईतून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील विजयी
 73. शिवसेनेच्या आयात उमेदवार निर्मला गावितांचाही पराभव, नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका, सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी
 74. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांचा विजय. तब्बल २६ हजार मतांनी आशिष शेलार यांचा विजय, पनवलेमधून भाजपचे प्रशांत ठाकूर विजयी, प्रशांत ठाकूर यांचा ९१ हजार ५१७ मतांनी विजय, कुडाळमधून वैभव नाईक १४ हजार मतांनी विजय
 75. पलुस- कडेगावात २० हजार मतदारांची नोटाला पसंती, लातूर ग्रामीणमध्ये तब्बल १५ हजार मतं नोटाला, बोरिवलीत १० हजारांहून अधिक मतं नोटाला.
 76. कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटलांची विजयी आघाडी. पिंपरी सेनेचे गौतम चाबुकस्वार ४ हजारांनी मागे, पुणे कँन्टोनमेंट काँग्रेसचे रमेश बागवे ६५० मतांनी पुढे. वडगाव शेरी- राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे १४ हजारांनी पुढे. भोर- काँग्रेसचे संग्राम थोपटे २४८५ मतांनी पुढे.
 77. पाथरी मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी, भाजपचे विद्यमान आमदार मोहन फड यांचा पराभव, सुरेश वरपूडकर १४ हजार ६७१ मतांनी विजयी. विक्रोळीमधून शिवसेनेचे सुनील राऊत विजयी, भाजपचे विद्यमान आमदार मोहन फड यांचा पराभव, अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याणशेट्टी विजयी
 78. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांची विजयी आघाडी, केजमध्ये नमिता मुंदडा, गेवराईत लक्ष्मण पवार विजयी, परळीत पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत
 79. माहिममधून सदा सरवणकर १७ हजार मतांनी पुढे, धारावीतून वर्षा गायकवाड १४ हजार मतांनी पुढे, मुंबादेवीतून अमीन पटेल १० हजार मतांनी पुढे, भिवंडी ग्रामीणमधून शिवसेनेचे शांताराम मोरे विजयी
 80. वरळीतून आदित्य ठाकरे ४२ हजार मतांनी आघाडीवर
 81. बारामतीत अजित पवार यांचा करिश्मा कायम, गोपीचंद पडळकरांसह सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त, बारामतीत शिरकाव करण्याचा भाजपचा प्रयत्न पुन्हा फसला., शिर्डीतून राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विजय, तब्बल ७५ हजार मतांनी राधाकृष्ण विखे विजयी. 
 82. हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी, कलबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी, 
 83. सावंतवाडी मतदार संघातून शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी
 84. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदार संघातून विजय निश्चित, ४० हजार मतांची घेतली आघाडी
 85. वांद्रे पूर्वमधून महाडेश्वरांना फक्त ८०० मतांची आघाडी, साकोलीतून डॉ. परिचय फुके आघाडीवर, पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी
 86. शिवडीतून शिवसेनेच्या अजय चौधरी यांचा विजय, अजय चौधरी ४० हजार मतांनी विजयी, 
 87. कणकवलीत नितेश राणेंच्या विजयी जल्लोषाला सुरूवात, शिवसेनेचे सतीश सावंत मोठ्या पिछाडीवर, 
 88. कोकणात राष्ट्रवादीचं खातं उघडलं, शेखर निकम विजयी, श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे यांना २३ हजारांची आघाडी, काँग्रेसचे नाना पटोले ३ हजार ६३ मतांनी पिछाडीवर, जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील विजयाच्या उंबरठ्यावर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे आघाडीवर
 89. अर्जुनी-मोरगाव- भाजपचे मंत्री राजकुमार बडोले मागे, राजकुमार बडोले १०९४ मतांनी पिछाडीवर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे आघाडीवर
 90. नगरमध्ये १० जागांवर युतीचे विद्यमान आमदार पिछाडीवर, फक्त दोन जागांवर भाजप उमेदवारांना आघाडी,  शिवाजी कर्डीले, विजय औटी, वैभव पिचड, राजळे पिछाडीवर, 
 91. चंद्रकांत पाटलांकडे फक्त ३ हजारांची आघाडी,कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांची आघाडी घटली. इंदापुरात हर्षवर्धन पाटील ९ हजारांची पिछाडीवर
 92. अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर विजयी, चिपळूणमधून राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी
 93. सावंतवाडी- दीपक केसरकर ९ हजार मतांनी पुढे, सिंदखेड्यात भाजपचे जयकुमार रावल विजयी, रावल यांचा ४२ हजार ५३० मतांनी विजय, राष्ट्रवादीचे संदीप बेडसे, धर्मा पाटलांचा मुलगा पराभूत
 94. कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त होण्याच्या मार्गावर, भाजपचे दोन्ही उमेदवार पराभवाच्या छायेत, सुरेश हळवणकर, अमल महाडिक पिछाडीवर
 95. परळीमध्ये धनंजय मुंडे यांची विजयी आघाडी, परळीमध्ये धनंजय मुंडे यांना २१ हजारांची आघाडी 
 96. कळमनुरी- सेनेचे संतोष बांगर १३ हजार मतांनी आघाडीवर, जालन्यातून सेनेचे अर्जुन खोतकर ७८८३ मतांनी मागे, 
 97. मानखुर्द-सपाचे अबू आझमी ४४ हजार मतांनी आघाडीवर, परभणी- शिवसेनेचे राहुल पाटील ४० हजार मतांनी पुढे, भोकरदन- संतोष दानवे १२ हजार मतांनी पुढे
 98. शहादामधून भाजपचे राजेश पाडवी विजयी, शहादामध्ये भाजपला पहिला विजयी गुलाल
 99. सावनेर- भाजपमध्ये सुनील केदार ३२८८ मतांनी पुढे, भिवंडी पूर्वमधून शिवसेनेचे रूपेश म्हात्रे पिछाडीवर, भोकर- काँग्रेसचे अशोक चव्हाण यांची आघाडी कायम, बडनेरातून रवी राणा यांना ३३५९ मतांची आघाडी
 100. इस्लामपूर- जयंत पाटील १९ हजार मतांनी आघाडीवर, कुडाळमधून वैभव नाईक ७८८८ मतांनी आघाडीवर, मोर्शीमधून भाजपचे अनिल बोंडे आघाडीवर
 101. भाजपचं २२० पारचं स्वप्न भंगण्याची शक्यता, बंडखोरीमुळं जागा घटत आहेत. शेवटच्या निकालापर्यंत महायुती २०० पर्यंत जाणार- रामदास आठवले
 102. मावळमध्ये सुनील शेळके यांना निर्णायक आघाडी, सुनील शेळके यांना ६५ हजारांची विजयी आघाडी
 103. अजित पवार बारामतीतून ७० हजारांनी आघाडीवर, वरळीतून आदित्य ठाकरे २३ हजारांनी आघाडीवर
 104. परळीत बहीण- भावात काटयाची टक्कर, परळीत धनंजय मुंडे १८ हजार मतांनी पुढे, १ लाख मतांची मोजणी पूर्ण, सव्वा लाख मत मोजणं बाकी, परळीत धनंजय मुंडे समर्थकांचा जल्लोष सुरू
 105. शरद पवार दुपारी १.३० वाजता पत्रकार परिषद घेणार, विधानसभा निकालाबाबक पवारांची पत्रकार परिषद
 106. साताऱ्यातून उदयनराजे भोसले ८१ हजार मतांनी पिछाडीवर, श्रीनिवास पाटील यांची विजयाकडे वाटचाल सुरू, पक्षांतरानंतर उदयनराजेंना फटका, ५ महिन्यात पराभव? 
 107. बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे ५ हजार ७८६ मतांनी आघाडीवर, पनवेलमधून प्रशांत ठाकूर २६ हजार मतांनी आघाडीवर, ऐरोलीत गणेश नाईक २४ हजार मतांनी आघाडीवर
 108. अलिबागमधून सेनेचे महेंद्र दळवी १५ हजार मतांनी पुढे, रावेरमधून राष्ट्रवादीचे शिरीष चौधरी आघाडीवर, चोपडामधून राष्ट्रवादीचे जगदीश दळवी आघाडीवर, अशोक चव्हाणांना ३९ हजार मतांची आघाडी, मावळमध्ये सुनील शेळके यांना निर्णायक आघाडी, सुनील शेळके यांना ५० हजारांची मोठी आघाडी, 
 109. परळीत बहिण भावाच्या लढतीकडे राज्याचं लक्ष, १० व्या फेरीअखेर धनंजय मुंडे यांना १३ हजारांची आघाडी, मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ
 110. पालघर- सेनेचे श्रीनिवास वनगा ९८१ मतांनी आघाडीवर, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील २७५० मतांनी मागे, मावळ- भाजप उमेदवार बाळा भेगडे पिछाडीवर, सुनील शेळके आघाडीवर, भेगडे ३५ हजारांनी मागे, सावंतवाडीतून दीपक केसरकर ४ हजार मतांनी आघाडी, केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा ९ हजार मतांनी पुढे, जालन्यातून सेनेचे अर्जून खोतकर पिछाडीवर, कुडाळमधून वैभव नाईक ४०७० हजार मतांनी पुढे, फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीवर, 
 111. गुहागरमध्ये भास्कर जाधव ३८०० मतांनी पुढे, चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम १९ हजारांनी आघाडीवर, रत्नागिरीत उदय सामंत यांना ३१ हजार मतांनी पुढे, केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा ९ हजार मतांनी पुढे, फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीत,  
 112. विजयकुमार गावितांना ५० हजार आघाडीवर, अशोक चव्हाणांनाही ३५ हजार मतांची आघाडी, विश्वजीत कदम ५१ हजार मतांची आघाडी, 
 113. यामिनी जाधव, अजय चौधरी, सुनील राऊत, सुनील प्रभू, विश्वनाथ महाडेश्वर, रविंद्र वायकर आघाडीवर
 114. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनही आघाडीवर, मुनंगटीवार आणि बबनराव लोणीकरही आघाडीवर
 115. सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर, वरळीतून आदित्य ठाकरे १६ हजार मतांन आघाडीवर , अजित पवारांना ५० हजार मतांनी पुढे
 116. चंद्रकांतदादा पाटील २० हजार मतांनी आघाडीवर, फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आघाडीवर
 117. श्रीनिवास पाटलांना मोठी आघाडी, राजेंची अडचण, उदयनराजे भोसले तब्बल ३२ हजार मतांनी पिछाडीवर
 118. मुंबईतल्या ३६ जागांपैकी ३१ जागांवर महायुतीची मुसंडी, अमिन पटेल, नसीम खान, वर्षा गायकवाड पिछाडीवर, मनसेला कुठेही आघाडी नाही, वंचित, एमआयएमही शून्यावर
 119. रत्नागिरीतून उदय सामंत २३ हजार मतांनी आघाडीवर, अजित पवारांना ३५ हजार मतांची विजयी आघाडी, कुडाळमधून वैभव नाईक ३०२७ हजार मतांनी पुढे, कलिनामध्ये काँग्रेस- शिवसेनेत काँटे की टक्कर, मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा यांना आघाडी, आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील १८ हजार मतांनी पुढे, संगमनेर- बाळासाहेब थोरात ९५३६ मतांनी पुढे, कुलाबा- भाजपचे राहुल नार्वेकर ६ हजार मतांनी पुढे, वडाळातून कालिदास कोळंबकर १० हजार मतांनी पुढे, 
 120. कळवा- मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड २५ हजार मतांनी पुढे, भोकरमधून काँग्रेसचे अशोक चव्हाण आघाडीवर, वरळीतून आदित्य ठाकरे १६ हजार मतांनी आघाडीवर, कणकवलीतून नितेश राणे १० हजार मतांनी आघाडीवर, तासगाव- सुमनताई पाटील ३४ हजार मतांनी पुढे, आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील १८ हजार मतांनी पुढे, 
 121. विटा- अनिल बाबर २५६७ मतांनी आघाडीवर, चंदगड- वंचितचे विनायक पाटील आघाडीवर, जत- काँग्रेसचे विक्रम सावंत आघाडीवर, इचलकरंजी- अपक्ष प्रकाश आवाडे आघाडीवर, शाहुवाडी- शिवसेनेचे सतीश पाटील आघाडीवर, राधानगरी- शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आघाडीवर
 122. कोथरूडमध्ये चंद्रकांतदादांना केवळ १ हजाराची आघाडी, पुरंदरमधून सेनेचे मंत्री विजय शिवतारे ४ हजारांची पिछाडीवर, अजित पवारांची विजयी आघाडी ३५ हजारांनी पुढे, विश्वजित कदम ४१ हजार मतांनी आघाडीवर, कागल- हसन मुश्रीफ ४६३ मतांनी आघाडीवर
 123. अशोक चव्हाण २२ हजार मतांनी आघाडीवर, मावळ- भाजप उमेदवार बाळा भेगडे पिछाडीवर, मावळ- राष्ट्रवादीचे सुनील शेळके आघाडीवर, बडनेरातून रवी राणा यांना २०८१ मतांची आघाडी, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे २ हजार आघाडीवर, औसातून अभिमन्यू पवार ९ हजार मतांनी पुढे, तिवसा- काँग्रेसच्या यशोमती ठाकूर चौथ्या फेरीतही मागे, 
 124. सातारा पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट, घाटकोपर पूर्वमधून भाजपचे पराग शहा आघाडीवर, दादर-माहिम मनसेचे उमेदवार संदिप देशपांडे पिछाडीवर
 125. सांगोल्यात गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत पिछाडीवर, नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा पिछाडीवर, क्षितीज ठाकूर पुढे, प्रणिती शिंदे २च्या क्रमांकावर, एमआयएम पहिल्या स्थानी
 126. मावळ- राष्ट्रवादीचे सुनील शेळके आघाडीवर, कुडाळमधून वैभव नाईक ३ मतांनी आघाडीवर, जामनेर- ५ व्या फेरीअखेर गिरीश महाजन आघाडीवर
 127. नगरमध्ये विखे- पाचपुते वगळता सेना- भाजप पिछाडीवर, नागपूर शहरात ६ जागांपैकी ४ ठिकाणी भाजपला आघाडी, 
 128. शिर्डीतून राधाकृष्ण विखे १४ हजार मतांनी पुढे, मलकापुरात भाजपचे चैनसुख संचेती पिछाडीवर, वरळीतून आदित्य ठाकरे ११ हजार मतांनी आघाडीवर
 129. निलंग्यात मंत्री संभाजी निलंगेकर यांना आघाडी, औसामध्ये अभिमन्यू पवार ५१८४ मतांनी आघाडीवर, लातूरमध्ये देशमुख बंधूंनाही आघाडी, 
 130. भाजप १०७ तर शिवसेना ६८ जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादीचं अर्धशतक, ५१ जागांवर आघाडी, काँग्रेस चौथ्या स्थानावर, ३९ जागांवर आघाडी
 131. कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर ११ हजार मतांनी पुढे, परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे आघाडीवर, माणमधून भाजपचे जयकुमार गोरे आघाडीवर
 132. नालासोपाऱ्यातून प्रदीप शर्मा पिछाडीवर, कोथरूड चंद्रकांत पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर, वरळीतून आदित्य ठाकरे ११ हजार मतांनी आघाडीवर
 133. ऋतुराज पाटील, नमिता मुंदडा, सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर, रोहित पवार, अदिती तटकरे आघाडीवर
 134. अजित पवारांना १८ हजार मतांची आघाडी, 
 135. येवल्यात छगन भुजबळ आणि संभाजी पवारांमध्ये टक्कर, येवल्यात मतमोजणीत तांत्रिक बिघाड, १२ नंबर टेबलवर मतमोजणी पुन्हा होणार 
 136. उदयनराजे भोसले तब्बल १० हजार मतांनी पिछाडीवर
 137. कोरेगाव राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आघाडीवर, मोहोळमधून राष्ट्रवादीचे यशवंत माने आघाडीवर, 
 138. नांदगावमधून पंकज भुजबळ ४५०० मतांनी पिछाडीवर, मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे आणि अपक्षामध्ये टक्कर, इस्लामपूर जयंत पाटील ५५०० मतांनी पुढे, साकोलीतून नाना पटोले मागे, परिणय फुके आघाडीवर, अक्कलकोट भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आघाडीवर, माणमधून भाजपचे जयकुमार गोरे आघाडीवर, फलटणमधून राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण आघाडीवर,माढ्यातून राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे आघाडीवर
 139. माळशिरसमधून राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आघाडीवर, चौथ्या फेरीअखेर धनंजय मुंडेंना ४ हजारांची आघाडी
 140. कोल्हापुरातल्या १० जागांवर महायुती पिछाडीवर, सांगली- कोल्हापुरात युती पिछाडीवर, आघाडीला यश, 
 141. पुण्यातील ८ जागांपैकी ५ जागी भाजप आघाडीवर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगरात राष्ट्रवादी पुढे, कसबा, कँटोन्मेंट, हडपसर, पर्वती, कोथरूडमध्ये भाजपला आघाडी
 142. सुभाष देशमुख, विजय देशमुख यांनाही सोलापुरात आघाडी, कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर
 143. सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदे ४४०० मतांनी पिछाडीवर, माढ्यात बबनदादा शिंदेंना १४ हजार मतांची आघाडी
 144. निलंगातून संभाजी पाटील निलंगेकर १८०० मतांनी पुढे, माहिमधून सदा सरवणकर आघाडीवर, राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आघाडीवर, अणूशक्तीनगरमधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक आघाडीवर, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार १७०० मतांनी पुढे, घाटकोपर पश्चिममधून राम कदम आघाडीवर, कणकवलीतून नितेश राणे ६ हजार मतांनी आघाडीवर 
 145. धुळे शहरात अनिल गोटेंना ८०० मतांची आघाडी, मुक्ताईनगरात अपक्ष चंद्रकांत पाटलांना ३४४ मतांची आघाडी, 
 146. तुळजापुरातून राणा जगजितसिंह यांना आघाडी, तिसऱ्या फेरीअखेर परळीतून धनंजय मुंडे पुढे, उस्मानाबाद आणि बार्शीत बंडखोरांचीच आघाडी, उस्मानाबादेत अजित पिंगळेंना तर बार्शीत राजेंद्र राऊतांना आघाडी, नागपूर पश्चिममधून सुधाकर देशमुख आघाडीवर, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटलांना ७ हजारांची आघाडी, 
 147. पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक आघाडीवर, गोंदियातून भाजप बंडखोर विनोद अग्रवाल आघाडीवर, बल्लारशाहमधून मुनगंटीवारांना १७०० मतांची आघाडी, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील पुढे, माळशिरसमधून राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आघाडीवर, अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर, पहिल्या फेरीनंतर अपक्ष अभिजीत बिचुकलेंना ८४ मतं. 
 148. औरंगाबाद मध्य सेनेचे प्रदीप जयस्वाल १५९१ मतांनी आघाडीवर , अतुल भातखळकर ७ हजार मतांनी आघाडीवर 
 149. बीड जिल्ह्यात भावडांची आणि काका- पुतण्याची लक्ष्यवेधी लढत, सलग तिसऱ्या फेरीत धनंजय मुंडेंची आघाडी कायम, मूळ गाव नाथ्र्यामध्येही धनंजय मुंडे यांनाच आघाडी, 
 150. लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे पिछाडीवर, श्रीनिवास पाटील यांना १८०१ मतांची आघाडी, साताऱ्याच्या लोकसभेत भाजप राष्ट्रवादीत काट्याची टक्कर
 151. दुसऱ्या फेरीअखेर परळीत धनजंय मुंडे १६५४ मतांनी पुढे
 152. बारामतीत अजित पवार ६५८९ हजार मतांनी आघाडीवर, पडळकरांना केवळ ८७२ मतं, अजितदादांना ७४६७ मतं, 
 153. बीडमधून संदीप क्षीरसागर ३०० मतांनी पुढे, इंदापुरात हर्षवर्धन पाटलांकडे ८१३ मतांची आघाडी, भुसावळमधून संजय सावकारे ७३५० मतांनी आघाडीवर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे ७४३८ मतांनी आघाडीवर, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील ६०१७ मतांनी आघाडीवर, गंगापूरमधून भाजपचे प्रशांत बंब २४०१ मतांनी पुढे
 154. कडेगाव- पलूसमधून विश्वजीत कदम यांनाही आघाडी, नगरमधून राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांनाही आघाडी, औरंगाबाद मध्यमधून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल आघाडीवर, फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांनाही आघाडी, कन्नडमधून दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव पिछाडीवर
 155. नांदगावमध्ये पंकज भुजबळ, सुहास कांदेंमध्ये टक्कर, पंकज भुजबळांना ३३९४ मतं, कांदेंना ५११६ मतं, सुहास कांदे यांच्याकडे २२८२ मतांची आघाडी,
 156. कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील आघाडीवर 
 157. भाजपचे मोठे मंत्री आघाडीवर, महायुती १४८ जागी आघाडीवर, महाजन, बागडे, गुलाबराव, चंद्रकांतदादा पाटील,  लोणीकर, खोतकर आणि माधुरी मिसाळही आघाडीवर, जामनेरमधून गिरीश महाजन १३२४ मतांनी आघाडीवर
 158. धनंजय मुंडेंकडे ४९९ मतांची आघाडी, परळीत मुंडे भावंडांमध्ये काट्याची टक्कर, धनंजय मुंडेंना ४७९५ मतं, पंकजांना ४२९६ मतं
 159. ठाण्यात एकनाथ शिंदे, संजय केळकर यांना आघाडी, कळवा-मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आघाडी, वांद्रे पूर्वमधून महापौर विश्वनाथ महाडेश्वरही आघाडीवर, महाडेश्वर तीन हजार मतांनी आघाडीवर
 160. महायुतीला पहिल्या कलांमध्ये बहुमत, १४५ जागी आघाडी, महाआघाडीचं अर्धशतक, ५५ जागांवर आघाडी, इतर आणि अपक्षांना केवळ ७ जागांवर आघाडी
 161. पहिल्या फेरीअखेर धनंजय मुंडे यांना ५०० मतांची आघाडी
 162. अपक्ष अभिजित बिचुकलेंना पहिल्या फेरीत शून्य मतं, आदित्य ठाकरेंना ७ हजार मतांची आघाडी
 163. पहिल्या फेरीनंतर रोहित पवार ३११९१ मतांनी आघाडीवर, काँग्रेस- राष्ट्रवादीला ५१ जागी आघाडीवर
 164. बीडमधून जयदत्त क्षीरसागर आघाडीवर, इतर आणि अपक्षांना केवळ ७ जागांवर आघाडी, सत्तास्थापनेपासून महायुती १० जागा दूर, १३५ वर आघाडी
 165. माढ्यात बबन शिंदे, पंढरपुरात भारत भालके आघाडीवर, आंबेगावातून दिलीप वळसे पाटीलही आघाडीवर, मिरजेतून सुरेश खाडेंना तर इचलकरंजीत आवाडे आघाडीवर, सांगोलामधून अनिकेत देशमुख आघाडीवर 
 166. परळीतून धनंजय मुंडे यांना १ हजार मतांची आघाडी, रोहित पवार ३०९१ मतांनी आघाडीवर
 167. जळगाव ग्रामीणमधून सेनेचे गुलाबराव पाटलांना आघाडी,  बडनेरातून रवी राणा यांना आघाडी, कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांनाही आघाडी
 168. शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखेंना आघाडी, आदित्य ठाकरे पहिल्या फेरीत सहा हजार मतांनी आघाडीवर, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार ३ हजारांनी आघाडीवर
 169. शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळेंनाा आघाडी, कुडाळमधून शिवसेनेच्या वैभव नाईक यांना आघाडी, कसब्यातून महापौर मुक्ता टिळक यांना आघाडी, भाजपच्या नमिता मुंदडा केज मतदारसंघातून आघाडीवर पोस्टल मतदानात पनवेलमधून प्रशांत ठाकूर आघाडीवर 
 170. काँग्रेस १३ आणि राष्ट्रवादी १८ जागांवर आघाडी 
 171. सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर आघाडीवर, औरंगाबामध्ये पूर्वमधून अतुल सावे आघाडीवर
 172. पहिल्या अर्ध्या तासात भाजप ५४ जागांवर आणि शिवेना ३५ जागांवर आघाडीवर 
 173. सुमनताई पाटील तासगावामधून आघाडीवर, जतमध्ये विक्रम सावंत आघाडीवर, सोलापूर मध्यमधून (CONGRESS)  प्रणिती शिंदे आघाडीवर
 174. कणकवलीतून भाजपचे  नितीश राणे आघाडीवर, ७१३ मतांनी आघाडीवर
 175. पंढरपूरमधून सुधाकरपंत परिचालक आघाडीवर, पहिल्या फेरीत ४ हजारांनी आघाडीवर
 176. पहिल्य फेरीत अतुल भातखळकर यांना ४ हजाराहून आघाडी मिळाली
 177. चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मण जगतापही आघाडीवर, महायुतीला आतापर्यंत 51 जागांवर आघाडी
 178. पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून आघाडीवर
 179. अशोक चव्हाण 1700 मतांनी आघाडीवर 
 180. नागपूरमध्ये मुख्यमंत्री आघाडीवर, भोकर मतदारसंघातून काँग्रेसचे अशोक चव्हाण आघाडीवर, एनसीपीचे अनिल देशमुख आघाडीवर, हिंगणातून भाजपचे समीर मेघे आघाडीवर
 181. काही मिनिटातच भाजपची मुंसडी, सुरूवातीच्या कलामध्ये सर्वत्र भाजपचे उमेदवार आघाडीवर
 182. वरळीत आदित्य ठाकरे आघडीवर
 183. मावळमध्ये भाजपचे बाळा भेगडे पिछाडीवर
 184. मुंबईत तीन जागांवर भाजप आघाडीवर, मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर 
 185. यंदा काँग्रेसमध्ये कुठेच राम नव्हता, बहुतांश ठिकाणी महायुतीच्या जागा निवडून येतील-  महाजन
 186. ९० टक्के जागा शिवसेना भाजपला मिळतील, २२० आकडा पार होण्याची शक्यता- महाजन
 187. या निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळणार- गिरीश महाजन
 188. काही क्षणात पहिला कल हाती येणार
 189. राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात
 190. सुरूवातीला पोस्टल मतांची मोजणी होणार
 191. स्ट्राँगरूम उघडायला सुरूवात, थोड्याच वेळात मतमोजणी
 192. निकालांनंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार, जागावाटपासंदर्भात चर्चा करणार- चंद्रकांत पाटील 
 193. 288 पार जागांवर विजय मिळेल असा विश्वास चंद्रकातदादा पाटील यांनी व्यक्त केला
 194. आता उत्सुकता शिगेला, उमेदवारांमध्ये धाकधूक
 195. कर्जत- जामखेड, कोथरूड, कणकवली यासारख्या जागांवर विशेष लक्ष
 196. काही वेळातच निकालाचा पहिला कल हाती येणार
 197. अर्ध्या तासात मतमोजणीला सुरूवात होणार
 198. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल
 199. आज महाराष्ट्रातल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
 200. विधानसभा निवडणुकीचे सर्वात जलद निकाल फक्त टाइम्स नाऊ मराठीवर
 201. 288 विधानसभा निवडणुकीच्या मतदारसंघांसाठी आज मतमोजणी

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी