राज्यातील 'कर्नाटक' पॅटर्नची पडद्यामागे खेळी... 

मुंबई
Updated Oct 25, 2019 | 19:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगळी समिकरणे चर्चिले जात आहेत. स्पष्ट बहुमत नसल्याने राज्यात कर्नाटक पॅटर्नची तयारी सुरू झाली आहे. 

Maharashtra election result vidhan sabha election result 2019 in Marathi karnataka pattern in maharashtra shiv sena congress ncp google batmya
राज्यातील 'कर्नाटक' पॅटर्नची पडद्यामागे खेळी...   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  महाराष्ट्राच्या जनतेने यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही किंवा बहुमताच्या जवळपासही नेले नाही. त्यामुळे राज्यात वेगळी समिकरणे निर्माण झाली आहेत. त्यामुळे दोन शक्यता निर्माण झाल्या आहेत. त्यात शिवसेनेने ज्याच्यासोबत युतीत निवडणूक लढवली त्या भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करणे.  तर दुसरा कर्नाटक पॅटर्न राबवून भाजपला सत्तेपासून दूर ठेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणे.  हे दोन पर्याय शिवसेनेसोबत आहेत. 

शिवसेनेच्या दुसऱ्या पर्यायाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन भाजपला पेचात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज घेतल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, शिवसेनेकडून असा कोणताही प्रस्ताव आला नाही. असा प्रस्ताव देताना त्यांना त्या विशिष्ट प्रभावाखालून बाहेर यावे लागले.  पण असा प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे असा प्रस्ताव आला नाही तर आम्ही आमच्या वरिष्ठांशी काही बोलू शकत नाही. त्यांनी प्रस्ताव पाठविला तर आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलू असे बाळासाहेब थोरात यांनी सांगून एक मोठी गुगलीच टाकली आहे.  

तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही सांगितले की, शिवसेनेने तशी मागणी केली आमच्याकडे तर निश्चित विचार करून असे सांगितले. पण अजूनही शिवसेनेकडून असा प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी