PM Narendra Modi: गरिबांना हक्काचं घर देण्याचा आमचा संकल्पः पंतप्रधान मोदी

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 16, 2019 | 17:06 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा नवी मुंबईतल्या खारघरमध्ये पार पडली. सेंट्रल पार्कजवळच्या मोठ्या मैदानात ही सभा आयोजित करण्यात आली होती. मोदींनी बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केलं.

Pm Modi rally
PM Narendra Modi: गरिबांना हक्काचं घर देण्याचा आमचा संकल्पः पंतप्रधान मोदी 

थोडं पण कामाचं

 • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतल्या खारघरमध्ये प्रचारसभा झाली.
 •  सेंट्रल पार्कजवळच्या मोठ्या मैदानात ही सभा आयोजित करण्यात आली होती.
 • ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेण या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतल्या खारघरमध्ये प्रचारसभा पार पडली. सेंट्रल पार्कजवळच्या मोठ्या मैदानात ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात गरिबांना स्वःचं हक्काचं घर देण्याचा आमचा संकल्प असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं आहे. तसंच मासेमाऱ्यांसाठी नव्या योजना आखत आहोत. त्यातच मासेमाऱ्यांचे पैसे थेट बँकेत जमा व्हावेत. तसंच त्यांच्या बोटी आधुनिक करण्यासाठी योजना सुरू असल्याचंही देखील मोदींनी सांगितलं.

ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेण या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं. मोदींच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून या परिसरात कडेकोट बंदोबबस्त ठेवण्यात आला.या सभेला नवी मुंबई आणि रायगड येथील महायुतीचे उमेदवार, कार्यकर्ते आणि उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यामुळे या मैदानात भव्य व्यासपीठासह मोठा सभामंडप उभारण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लाईव्ह

 1. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा आणूया, पुन्हा आणूया, आपलं सरकार- मोदी
 2. लोकसभा निवडणुकीसारखं मोठ्या संख्येनं मतदान करा, जुने सर्व रेकॉर्ड मोडून काढा
 3. आवश्यक मतदान करा, मोठ्या संख्येनं मतदानकेंद्रावर पोहचा- मोदी
 4. 21 ऑक्टोबरला तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे
 5. गरीबांना घर देण्याचा संकल्प आमचा आहे- पंतप्रधान
 6. रिअर इस्टेटमुळे प्रत्येक तरूणाचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न पूर्ण करेल
 7. रेराचा कायदा भाजपनं आणला, याचा लाभ जास्त महाराष्ट्राला झाला
 8. पिण्याच्या पाण्यासाठी योग्य नियोजन करा. यासाठी सरकारकडून योजनेवर काम सुरू
 9. मासेमाऱ्यांसाठी योजना, बोटी आधुनिक करणार, बँकेतून थेट पैसे मिळण्याची सुविधा देणार
 10. नवी मुंबईतून विमानं लवकरच उड्डाण घेणार
 11. लाल फितीतून महाराष्ट्र बाहेर निघतोय- पंतप्रधान
 12. महाराष्ट्रात लाखो योजनांवर काम सुरू आहे. पनवेल- ठाण्यात मेट्रोल विस्तार
 13. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एफडीआय आला
 14. आता मुंबईत देवेंद्रला पुन्हा एकदा त्याच ताकदीनं सत्तेत बसवा
 15. नरेंद्र- देवेंद्रचा फॉर्म्यूला ५ वर्षांत सुपरहिट ठरला
 16. जेव्हा नरेंद्र आणि देवेंद्र एकत्र उभे राहतात तेव्हा एक- एक दोन होत नाही तर अकरा होतात
 17. दिल्लीत जसं पुन्हा नरेंद्रला बसवलं तसंच पुन्हा महाराष्ट्रात देवेंद्रला बसवा- मोदी
 18. दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र- नरेंद्र मोदी
 19. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात
 20. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुरू होणार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी