Maharashtra Electricity Price Hike: महावितरणाकडून ग्राहकांना करंट; MERC कडे 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 28, 2023 | 21:26 IST

Maharashtra Electricity Price Hike: महागाईमुळे (inflation) बेजार झालेल्या नागरिकांना महावितरण कंपनीकडूनही (Maharashtra Electricity company)दरवाढीचा करंट लागला आहे. कंपनी आपला आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांचा खिशा कापणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना 440 चा शॉक लागेल.

Maharashtra Electricity Price Hike by 37 percent
वीज ग्राहकांना महावितरणाकडून दरवाढीचा करंट   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आगामी वीजदर आढाव्यात तब्बल 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे.
  • दर पाच वर्षानंतर दरमध्ये बदल केला जातो.
  • बेस्ट प्रशासनाकडून मुंबईत 18 टक्क्यांनी वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव

Maharashtra Electricity Price Hike: महागाईमुळे (inflation) बेजार झालेल्या नागरिकांना महावितरण कंपनीकडूनही (Maharashtra Electricity company)दरवाढीचा करंट लागला आहे. कंपनी आपला आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांचा खिशा कापणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना 440 चा शॉक लागेल.  (Maharashtra Electricity Price Hike by 37 percent) 

अधिक वाचा  : एटीएम कार्डची अदलाबदली, सराईत गुन्हेगार अटकेत

आगामी वीजदर आढाव्यात तब्बल 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. यामुळे 37 टक्क्यांनी दरवाढ होणार असल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. या प्रस्तावामुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणींना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता आहे. आधीच पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस लाईट येण्याची पाहावी लागते. आता वाट पाहूनही शेतकऱ्यांना अधिकचा दर द्यावा लागणार आहे.  
 अधिक वाचा  :  नाशिकमध्ये भाजपला मोठे खिंडार

घरगुती  ग्राहकांसाठी 3.36 रुपये प्रति युनिट घेतला जातो. जर महावितरणने  दरवाढ केली तर नवीन  दरांनुसार 2023-24 साठी  4.50 रुपये प्रतियुनिट होऊ शकतात. कृषीसाठी  तर  सध्याचा विज दर  11.  86 आहे, यात वाढ झाली तर प्रति युनिटसाठी शेतकऱ्यांकडून 16.60 रुपये वसूल केले जातील. या दोन्ही श्रेणीमधील सन 2024-25 साठीचा वीजदर अनुक्रमे 5.1  रुपये ते 18.70 प्रति युनिट प्रस्तावित आहे.  

अधिक वाचा  : अदानी ग्रुपमुळे एलआयसीला 18,300 कोटी रुपयांचा तोटा
 व्यावसायिक श्रेणीतील ग्राहकांचा विचार केला तर सध्या असलेला किमान 7.07 रुपये ते 9.60 रुपये प्रतियुनिटचा दर आता 12.76 रुपये ते 17.40 रुपये प्रति युनिट इतका प्रस्तवित आहे. त्यापुढील वर्षासाठी हा दर किमान 11 रुपये ते कमाल 20 रुपये प्रति युनिट इतका प्रस्तावित आहे. लघुदाब औद्योगिक श्रेणीतील हा दर आता 5.11 रुपये ते 6.05 रुपये प्रति युनिटवरून 6.90 ते 8.20 रुपये प्रति युनिट प्रस्तावित आहे. उच्चदाब औद्योगिक श्रेणीतील ग्राहकांना आता सध्याच्या 6.89 रुपये प्रतियुनिटवरून 9.32 व त्यानंतरच्या वर्षी 10.50 रुपये प्रति युनिट इतका असेल.

रुपये प्रतियुनिट कमाल दर 16.60 रुपये 

दर पाच वर्षानंतर दरमध्ये बदल केला जातो. यादरम्यान काही मध्यकालीन आढावा काढला जातो. आत्ताचे लागू असलेले दर हे 2020 पासून लावण्यात आले आहेत. जर विद्युत नियामक आयोगाने महावितरणाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला तर या वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून नवीन दर लागू होतील. 


 
 या वीज कंपनींनी वाढवला आहे दर 

बेस्ट प्रशासनाकडून मुंबईत 18 टक्क्यांनी वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात अदानी इलेक्ट्रिसिटीकडून 2 ते 7 टक्के वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तर टाटा पावरकडून 10 ते 30 टक्के वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवण्यात आला आहे. अदानी आणि टाटा पावर नंतर आता बेस्ट प्रशासनाने वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी