राज्यातील हॉटस्पॉटमध्ये ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढले

महाराष्ट्र सरकारने  राज्यातील हॉट स्पॉट भागात लॉकडाऊन येत्या ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि सोलापूर यांचा समावेश आहे. 

maharashtra extends lockdown in hotspot areas like mumbai pune malegaon aurangabad solapur till may marathi news
राज्यातील हॉटस्पॉटमध्ये ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढले  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्र सरकारने  राज्यातील हॉट स्पॉट भागात लॉकडाऊन येत्या ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
  • . यात मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि सोलापूर यांचा समावेश आहे. 
  • गुरूवारी राज्य सरकारने या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत लॉकडाऊन वाढविण्यासाठीच्या शक्यतेवर चर्चा झाली.

मुंबई : महाराष्ट्र सरकारने  राज्यातील हॉट स्पॉट भागात लॉकडाऊन येत्या ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि सोलापूर यांचा समावेश आहे. 


गुरूवारी राज्य सरकारने या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत लॉकडाऊन वाढविण्यासाठीच्या शक्यतेवर चर्चा झाली. यात राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन या महिन्याच्या अखेरपर्यंत वाढविण्यावर भर दिला. 

तर लॉकडाऊन ३.० संपण्यापूर्वी केंद्र सरकार जी मार्गदर्शक तत्त्वे अवलंबणार आहेत  तीच राज्यातील इतर भागांना लागू होणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. 

या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. 


गुरूवारी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. गुरूवारी १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. 

कोविड १९च्या पार्श्वभूमीवर देशात २४ मार्चला पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर १४ एप्रिल आणि ४ मे रोजी दुसरा आणि तिसरा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तर १७ मे नंतर चौथा लॉकडाऊन होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. पण हे चौथे लॉकडाऊन इतर तीनपेक्षा वेगळे असणार असल्याचे मोदींनी जाहीर केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी