Maharashtra Farmers protest long march: आपल्या विविध मागण्यांच्या संदर्भात राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांनी लाँग मार्च काढला. हा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाला. मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासी बांधव या लाँग मार्चमध्ये उपस्थित आहेत. लाँग मार्च वाशिंद येथे पोहोचला असून या शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात गुरुवारी (16 मार्च 2023) बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक झाली. मात्र, असे असले तरी शेतकऱ्यांनी आपला लाँग मार्च मागे घेतलेला नाहीये.
शेतकरी नेत्यांनी सांगितले की, राज्य सरकारसोबत आमच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली मात्र, असे असले तरी आम्ही लाँग मार्च मागे घेणार नाहीत. मोर्चा आहे तेथेच आम्ही थांबवत आहोत. काही मागण्या या विचाराधीन आहेत आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही.
हे पण वाचा : व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
शेतकरी मोर्चा काढतात आणि दरवेळी सरकार केवळ आश्वासने देतं. त्यामुळे आम्ही माघार घेणार नाही. सरकारने ज्या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली आहे त्याच्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शुक्रवारी (17 मार्च 2023) शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेहे विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा : हाता-पायाला मुंग्या येतात? जाणून घ्या घरगुती आणि रामबाण उपाय
शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून शेतकरी लाँगमार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात माहिती देण्यात येईल. लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले
नाशिक येथून शेतकऱ्यांचा लाँगमार्च निघाला असून माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
हे पण वाचा : उन्हाळ्यात या फुलाचे पाणी तुमच्यासाठी ठरेल संजीवनी
नाशिक येथून शेतकऱ्यांचा लाँगमार्च निघाला असून माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 16, 2023
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, शेतकरी शिष्टमंडळातील उपस्थित होते. बैठकीत परंपरागत पद्धतीने आदिवासी कसत असलेल्या जमिनी, वनहक्क दावे, कांद्याचा प्रश्न,वनांमधील अतिक्रमणे, गायरान जमिनी, शेतकऱ्यांना बारा तास वीज,शेतीविषयक कर्ज आदी मुद्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. शासनाने दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल माजी आमदार गावित यांनी आभार मानले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.