Aslam Shaikh : मुंबई : ईडीच्या (Enforcement Directorate) रडावर असलेले माजी मंत्री (Ex minister) आणि काँग्रेसचे आमदार (Congress MLA) अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी काल भाजप नेते (BJP Leader) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadanvis) यांची भेट घेतली आहे. शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीनंतर आता काँग्रेसचे नेतेही भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. अशी शक्यता वर्तवली जात असताना काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी भाजप नेते फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एका बाजूला संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे तर दुसरीकडे काँग्रेस आमदार शेख यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. (Maharashtra Former Minister And Congress Mla Aslam Sheikh Met Devendra Fadnavis after kirit somaiya scam allegation)
अधिक वाचा : ....म्हणून संजय राऊतांवर ईडीची कारवाई, काँग्रेसने उपस्थित केली भलतीच शंका
रविवारी अस्लम शेख यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर या बंगल्यावर भेट घेतली. यावेळी भाजप नेते मोहित कंबोजही उपस्थित होते. आता अस्लम शेख भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर अस्लम शेख आणि फडणवीस यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
#WATCH मुंबई में ईडी के राडार पर चल रहे कांग्रेस नेता और पूर्व मंत्री असलम शेख ने आज बीजेपी नेता और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से उनके घर जाकर मुलाकात की। #MaharashtraPolitics #SanjayRaut pic.twitter.com/vOJVzTkWI3 — NBT Hindi News (@NavbharatTimes) July 31, 2022
३० जुलै रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अस्लम शेख यांच्यावर ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. सोमय्या म्हणाले होते. मालवणी आणि मढ भागात २९ फिल्म स्टुडियोंचे काम सुरू आहे. यातील ५ स्टुडीयो हे सीआरझेड क्षेत्रात येत आहेत. २०१९ साली ही जागा हिरवगार होती, परंतु पर्यटन विभागाने ही भागा सीआरझेड भागात येत नसल्याचे म्हटले होते. कागदावर या भागात जमीन तर समुद्र दूर दाखवण्यात आला होता. या भागातील खारफुटीची झाडे तोडून हे स्टुडियो उभारण्यात आले होते असा आरोप सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी पर्यावरण आणि वन मंत्रालयाला तक्रार मिळाली आहे. त्यानंतर ईडीनेही याबद्दल चौकशी सुरू केली आहे.
माजी मंत्री अस्लम शेख यांनी एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप — DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 26, 2022
मालवणी,मढ ,मार्वे परिसरात २८ स्टुडिओंचे व्यावसायिक बांधकाम अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने पर्यावरण नियमांचं उल्लंघन करून करण्यात आलं - @KiritSomaiya @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/jbUblLo4tv
अधिक वाचा : संजय राऊत अटकेत, ईडीची कारवाई
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.