महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, 'या' तारखेपासून हॉटेल, लॉज सुरू होणार 

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 06, 2020 | 21:24 IST

Hotels open in Maharashtra: राज्यात आता हॉटेल्स सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. येत्या ८ जुलैपासून कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी अटी आणि शर्थींसह हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

maharashtra government allow hotels outside containment zones to operate 33 percent capacity from 8 july
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, 'या' तारखेपासून हॉटेल, लॉज सुरू होणार (प्रातिनिधीक फोटो) 

थोडं पण कामाचं

 • हॉटेल व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी 
 • प्रतिबंधित क्षेत्र, कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी हॉटेल सुरू होणार 
 • ८ जुलैपासून सुरू करण्याबाबत मुख्य सचिवांचे आदेश

Maharashtra government allow hotels to operate: महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत आता हॉटेल्स (Hotel), लॉज (Lodge) सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोन (Containment Zone) आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी हॉटेल्स सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ८ जुलैपासून हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस अटी आणि शर्तींसह सुरू करता येणार आहेत. हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसला संपूर्ण क्षमतेच्या ३३ टक्के सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

अटी शर्थी लागू असणार

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील व्यवसाय, व्यापार, कंपन्या सुरू झाल्या होत्या मात्र, हॉटेल व्यवसाय (Hotel Business) बंदच होता. पण आता सरकारने हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल्स सुरू करण्याच्या संदर्भातील आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी काढले आहेत. सरकारने ही हॉटेल्स सुरू करण्याच्या संदर्भात अटी आणि शर्थी (Guidelines) लागू केल्या आहेत.

नियमांचे पालन आवश्यक

 1. हॉटेलच्या दर्शनी भागात कोविड संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शिका या विषयी माहिती देणारे फलक असणे आवश्यक आहे.
 2. त्याबरोबरच गर्दी टाळण्यासाठी आणि वाहनतळासाठी योग्य व्यवस्था आवश्यक आहे.
 3. सामाजिक अंतर राखले जावे अशी बैठक व्यवस्था सुनिश्चित करणे बंधनकारक आहे.
 4. थर्मल स्क्रिनिंग करण्याबरोबरच स्वागत कक्षाला संरक्षक काच असणे आवश्यक आहे. 
 5. सर्वांसाठी सहज निर्जंतुकीकरण द्रव्य उपलब्ध करणे आवश्यक आहे. 
 6. हॉटेल कर्मचाऱ्यांसह अतिथींना मास्क, हातमौजे इत्यादी साहित्य उपलब्ध करणे आवश्यक आहे. 
 7. पैशाच्या देवाणघेवाणीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहिजे.
 8. उद्‌वाहन (लिफ्ट) मधील संख्याही नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच वातानुकुलित यंत्रणेसंदर्भात वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तापमान २४ ते ३० डिग्री अंश सेल्सीअस आणि आर्द्रता ४० ते ७० टक्के असावी.
 9. हॉटेलमध्ये केवळ लक्षणे नसलेल्या अतिथींनाच प्रवेश देण्यात यावा, त्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. 
 10. आरोग्य सेतू ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. 
 11. तसेच त्यांनी आपले प्रवास तपशिल, आरोग्य विषयक माहिती आणि ओळखपत्र देणे आवश्यक आहे. 
 12. हॉटेलच्या खोल्या स्वच्छ निर्जंतुकरण केलेल्या असणे आवश्यक आहे. प्रत्येक अतिथी गेल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा होणे आवश्यक आहे. 
 13. एखादा अतिथी आजारी किंवा लक्षणाचा दिसल्यास त्याचे विलगीकरण करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात पर्यटन (Maharashtra Tourism) व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स (Hotel) आणि रेस्टॉरंट (Restaurant) सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी सांगितले. त्यानंतर आता हॉटेल्स सुरू करण्याबाबदचे आदेश काढण्यात आले आहेत.

राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पादाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. हॉटेल्समधअये येणारा प्रत्येक प्रवासी, व्यक्ती निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व कर्मचारी आजारी पडू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी