ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील संभाव्य खातेवाटप, पाहा संपूर्ण यादी

मुंबई
Updated Jan 04, 2020 | 23:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Thackeray sarkar: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून लवकरच खातेवाटप जाहीर होणार आहे. नेमकं हे खातेवाटप कसं असेल याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

maharashtra government cm uddhav thackeray ministers portfolio possibility marathi news
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील संभाव्य खातेवाटप  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं- सूत्र
 • कृषी, नगरविकास खाते शिवसेनेकडे - सूत्र 
 • गृहनिर्माण खाते राष्ट्रवादीकडे - सूत्र 
 • सार्वजनिक बांधकाम खाते अशोक चव्हाणांकडे - सूत्र 

मुंबई: शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर लवकरच या सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात येणार आहे. हे खातेवाटप नेमकं कसं असेल याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र, खातेवाटपाची संभाव्य यादी समोर आली आहे. पाहूयात कसं असेल हे मंत्रिमंडळाचं संभाव्य खातेवाटप...

उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) - सामान्य प्रशासन विभाग 

अजित पवार (उपमुख्यमंत्री) - अर्थमंत्री

 1. एकनाथ शिंदे - नगरविकास

 2. सुभाष देसाई - उद्योगमंत्री

 3. छगन भुजबळ - अन्न आणि नागरी पुरवठा

 4. जयंत पाटील - जलसंपदा

 5. बाळासाहेब थोरात - महसूल 

 6. नितीन राऊत - ऊर्जा 

 7. अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम 

 8. दिलीप वळसे पाटील - राज्य उत्पादन शुल्क 

 9. धनंजय मुंडे - सामाजिक न्याय

 10. विजय वड्डेटीवार - ओबीसी, मदत-पुनर्वसन 

 11. अनिल देशमुख - गृहमंत्री

 12. हसन मुश्रीफ - ग्रामविकास 

 13. वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण 

 14. डॉ. राजेंद्र शिंगाणे - अन्न आणि औषध प्रशासन 

 15. नवाब मलिक - अल्पसंख्यांक 

 16. राजेश टोपे - आरोग्य 

 17. सुनिल केदार - दुग्धविकास, पशुसंवर्धन 

 18. संजय राठोड - वन खाते 

 19. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा 

 20. अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक 

 21. दादा भुसे - कृषी 

 22. जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण 

 23. संदिपान भुमरे - रोजगार हमी

 24. बाळासाहेब पाटील - सहकार 

 25. यशोमती ठाकूर - महिला-बालकल्याण 

 26. अनिल परब - परिवहन, संसदीय कामकाज 

 27. उदय सामंत - उच्च, तंत्रशिक्षण आणि पर्यावरण 

 28. के.सी. पाडवी - आदिवासी विकास 

 29. शंकरराव गडाख - जलसंधारण 

 30. असलम शेख - वस्त्रोद्योग, बंधारे, मत्स्य व्यवसाय 

 31. आदित्य ठाकरे - परिवहन, पर्यटन

 32. सतेज पाटील - गृहराज्यमंत्री (शहर)

 33. विश्वजित कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्री 

 34. शंभूराजे देसाई - गृह (ग्रामीण), वित्त आणि पणन राज्यमंत्री

 35. अब्दुल सत्तार - ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी