Maharashtra: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 16, 2022 | 20:28 IST

Maharashtra State Government Employees DA increased: राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 

Maharashtra Government Employees DA increased by 3 per cent announced by CM Eknath Shinde
Maharashtra: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव ३ टक्के महागाई भत्ता
  • वाढीव महागाई भत्ता ऑगस्टपासून लागू होणार
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

DA of Maharashtra Government employees hike: राज्य सरकारमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. यानुसार आता राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव ३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. (Maharashtra Government Employees DA increased by 3 per cent announced by CM Eknath Shinde)

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे आता महागाईभत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

अधिक वाचा : शिवसेनेत गेलेले भाजपचे माजी आमदार परतले स्वगृही

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (#GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती दिले आहेत.

गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावे अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता १० लाखांचे विमासंरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे  प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

बातमी अपडेट होत आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी