राज्यात लॉकडाऊन वाढवला, 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत परवानगी दिलेल्या गोष्टी सुरू राहणार 

Maharashtra Government extends lockdown: राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये यापूर्वी सरकारने दिलेल्या परवानगीनुसारचे व्यवहार सुरू राहणार

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. दिवसेंदिवस रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून बाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र, असे असले तरी राज्य सरकारने सावधगिरी म्हणून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आता ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र, असे असले तरी 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत राज्य सरकारने यापूर्वी ज्या गोष्टी, व्यवहारांना परवानगी दिली आहे ते सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत. राज्य सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या-ज्या गोष्टींसाठी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेली आहे, त्या कायम राहतील. त्यामुळे हा लॉकडाऊन म्हणजे पूर्णत: लॉकडाऊन नसून केवळ मर्यादित गोष्टींसाठीच असणार आहे. मात्र, असे असले तरी राज्य सरकारने कोविड-१९ संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन नागरिकांना करणे अनिवार्य आहे. 

लॉकडाऊन नंतर देशात आणि राज्यात अनलॉक होण्यास सुरुवात झाली. राज्य सरकारने सुद्धा मिशन बिगिन अगेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटींवर अनेग बाबींना समंती दिली. मात्र, अद्यापही लोकल ट्रेन्स सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सुद्धा अद्याप बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकर सुरू होईल असे दिसत आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली असून रेल्वे प्रशासनासोबत चर्चा ही सुरू आहे. सर्व सामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू कऱण्याच्या संदर्भात राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला एक नियोजित वेळेचा प्रस्तावही सादर केला आहे.

राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत कोण-कोणत्या गोष्टींना परवानगी यापूर्वी दिली आहे त्यावर एक नजर टाकूयात.

या गोष्टींना मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन परवानगी 

  1. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी ग्रंथालये कोविड-१० मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन १५ ऑक्टोबरपासून सुरू 
  2. मेट्रो रेल्वे देखील निर्देशित कार्यपद्धतीने सुरू करण्यात आली आहे 
  3. लोकल ट्रेनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिलांना ठराविक वेळेत प्रवासाची मुभा
  4. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर जनावरांच्या बाजारासहित स्थानिक आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शहरी, ग्रामीण स्थानिक प्रशासनाची मार्गदर्शक तत्वे लागू 
  5. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर १५ ऑक्टोबरपासून बाजारपेठ आणि दुकाने अतिरिक्त दोन तास म्हणजे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
  6. विवाह आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमात पाहुण्यांची संख्या ५० पेक्षा जास्त ठेवता येणार नाही. अंतिम संस्कारासाठी ही संख्या पूर्वी जारी केलेल्याप्रमाणे २० असेल
  7. १५ ऑक्टोबरपासून कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेले बिझनेस-टू-बिझनेस प्रदर्शनासाठी परवानगी 
  8. राज्यात हॉटेल्स, फूडकोर्ड, रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे  
  9. राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्ट २०२० पासून सुरू करण्यास संमती 
  10. खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्ट २०२० पासून संमती 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी