Shiv Jayanti 2021 Guidelines: शिवजयंतीसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना

Shiv Jayanti 2021 Guidelines: छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती (Shiv Jayanti) हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च २०२ रोजी साजरा केला जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर.

Shiv Jayanti 2021 guidelines issues by maharashtra government chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
शिवजयंतीसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना  |  फोटो सौजन्य: IANS

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती (Shiv Jayanti) हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च २०२ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021) उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने (Maharashtra Government issues guidelines) दिल्या आहेत.

(Maharashtra Government issue Guidelines for Shiv Jayanti 2021)

'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' निमित्ताने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

  1. या दिवशी अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/ किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी. 
  2. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी अशा कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
  3. तसेच दरवर्षी प्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
  4. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम /शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जागृती करावी. 
  5. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
  6. कोविड-१९च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी