Omicron Protocol in Maharashtra महाराष्ट्रातील ओमायक्रॉन प्रोटोकॉलमध्ये बदल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 02, 2021 | 19:57 IST

Omicron Protocol For Maharashtra केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या ओमायक्रॉन संदर्भातल्या नियमावलीत तफावत होती. पण महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या नियमांमध्ये बदल करुन केंद्राच्या नियमांसारखेच नियम राज्यात लागू केले आहेत.

Omicron
महाराष्ट्रातील ओमायक्रॉन प्रोटोकॉलमध्ये बदल 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील ओमायक्रॉन प्रोटोकॉलमध्ये बदल
  • केंद्राच्या नियमांसारखे नियम महाराष्ट्रात लागू
  • शाळांबाबतच्या निर्णयात कोणताही संभ्रम नाही - अजित पवार

Maharashtra Government Update Omicron Protocol मुंबईः केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या ओमायक्रॉन संदर्भातल्या नियमावलीत तफावत होती. पण महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या नियमांमध्ये बदल करुन केंद्राच्या नियमांसारखेच नियम राज्यात लागू केले आहेत. यामुळे केंद्राच्या आणि राज्याच्या ओमायक्रॉन संदर्भातल्या नियमावलीतील तफावत दूर झाल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. 

परदेशातून भारतातील विमानतळावर प्रवासी आले तर देश म्हणून एकसारखा नियम लागू करणे आवश्यक आहे. कोणत्या राज्यातील विमानतळावर उतरले याचा विचार करण्याऐवजी आपल्या देशातील विमानतळावर आले असल्याचा विचार व्हायला हवा. याच दृष्टीकोनातून नियमांमधील तफावत दूर केल्याचे अजित पवार म्हणाले. 

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना जास्तीत जास्त ४८ तास आधीचा आरटीपीसीआर अहवाल सादर करण्याचे बंधन असले. महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्यांनाही अशाच स्वरुपाचे बंधन असते, असे अजित पवार यांनी सांगितले. 

दर आठवड्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएसीच्या जागांचा आढावा घेतला जातो. काही विभागांकडून रिक्त जागांची माहिती मिळाली नव्हती. पण लवकरच ती मिळेल आणि रिक्त जागा भरण्यासाठी नियमानुसार प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 

सध्याचे कोरोना संकट आणि ओमायक्रॉनमुळे निर्माण झालेली परिस्थिती यांचा आढावा घेऊन तसेच मुलांच्या आरोग्य विषयक सुरक्षेचा विचार करुनच शाळांबाबतचे निर्णय घ्यावे असे ठरले आहे. शाळांविषयी आधी निर्णय झाला तेव्हा ओमायक्रॉन विषयीची माहिती राज्य शासनाकडे नव्हती. यामुळे शाळांबाबतच्या निर्णयात कोणताही संभ्रम नाही. मुलांच्या आरोग्य विषयक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत समिती नेमली आहे. जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत सरकार काही करू शकत नाही असे अजित पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. एसटीच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ दिली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे अजित पवार म्हणाले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी