Maharashtra Government Jobs: शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ, वाचा संपूर्ण शासन निर्णय 

Maharashtra Government Recruitment updates: नोकरभरतीच्या संदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्य शासनाच्या सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता
  • नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत २ वर्षांची शिथिलता
  • २ वर्षांची शिथिलता देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे

Maharashtra Government Recruitment latest updates: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रीया सुरु करण्याचे घोषित केले असून, याकरीता पदभरतीवरील निर्बंध काही कालावधीकरीता शिथिल करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने भरती प्रक्रीया सुरु झाली आहे. मात्र, विविध कारणांमुळे (उदा. कोरोना, सदोष मागणीपत्रे व मागणीपत्र न पाठविणे इ.) पुरेशा जाहिराती प्रसिध्द न झाल्याने, ज्या उमेदवारांना परिक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परिक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी त्यामुळे शासनाने कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा : ट्रेनचं वजन किती असतं रे भाऊ?

या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन 25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे) देण्यात येत आहे.

हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?

ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन 25 एप्रिल 2016 मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देय राहील.

हे पण वाचा : रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

सदर शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी जाहिराती प्रसिध्द झालेल्या आहेत तथापि अद्याप उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही. अशा सर्व जाहिरातींसाठी देखील वरील (1) व (2) नुसार कमाल वयोमर्यादेतील शिथिलता लागू राहील. त्यानुसार संबंधित जाहिरातीच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता दिल्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुरेशी मुदतवाढ देण्यात यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी