Maharashtra Cabinet decision: पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 10, 2022 | 18:23 IST

Maharashtra Government Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शिंदे सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Maharashtra Government takes big decision regarding flood affected farmers in state cabinet decision in marathi
Maharashtra Cabinet decision: पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय 
थोडं पण कामाचं
  • राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली, कॅबिनेट बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
  • एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत पूरग्रस्तांना देणार 
  • अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा 

Maharashtra Government decision for farmers: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांसाठी शिंदे सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्तांना मदतीच्या संदर्भात माहिती दिली आहे. (Maharashtra Government takes a big decision regarding flood affected farmers in state cabinet decision in marathi)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. जवळपास १५ लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमच्या सरकारने एक विशेष बाब म्हणून एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हणाले, अतिवृष्टीच्या संदर्भात२ हेक्टरची मर्यादा होती. ही बदलून आता ३ हेक्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे ६ हजार ८०० रुपये हेक्टरी मिळत होते आता त्याच्या दुप्पट देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

अधिक वाचा : Shiv Sena News: उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेल्या आमदाराला मिळालं मोठं गिफ्ट

मुंबई मेट्रो मार्गिका ३ च्या सुधारित प्रस्तावाला मान्यता

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग- ३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च २३ हजार १३६ कोटी इतका होता तो आता ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख रुपयांचा होईल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग व्हावा यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येणार आहे. सुधारित आराखड्यानुसार, राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी ७ लाख वरुन आता ३ हजार ६९९ कोटी ८१ लाख इतकी झाली आहे. या संदर्भात राज्याच्या समभागापोटी १ हजार २९७ कोटी ७४ लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्याचे निर्देश दिले आहेत. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

  1. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत, एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार
  2. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता
  3. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी