किल्ले प्रतापगड येथे अफजल खानचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा उभारणार, गडावरील अतिक्रमण हटवल्यावर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 15, 2022 | 17:51 IST

Maharashtra Government decision about pratapgadh fort: प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्यावर आता राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटनमंत्री मगलप्रभात लोढा यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

maharashtra government will build grand shiv smarak and tableau which shows chhatrapati shivaji maharaj killed afzal khan at pratapgarh fort
किल्ले प्रतापगड येथे अफजल खानचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा उभारणार, गडावरील अतिक्रमण हटवल्यावर राज्य सरकारचा मोठा निर्णय  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्यावर राज्य सरकारचा मोठा निर्णय
  • किल्ले प्रतापगड येथे अफजल खानचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा उभारणार 
  • पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय

Pratapgadh Fort Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा कोथळा बाहेर काढला होता त्या किल्ले प्रतापगडावर आता शिवप्रताप स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. इतकेच नाही तर त्या ठिकाणी लाईट आणि साऊंड शो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भातील आदेश दिले असून सचिवांना या प्रकरणात काम सुरू करण्यास सांगितले आहे. (maharashtra government will build grand shiv smarak and tableau which shows chhatrapati shivaji maharaj killed afzal khan at pratapgarh fort)

प्रतापगडावर झालेले अतिक्रमण पाडण्याचं काम काही दिवसांपूर्वीच झालं. त्यानंतर आता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक पत्रक सुद्धा काढलं आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हटलं, "महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज व अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगाची इतिहासात महत्वाची नोंद आहे, जी आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करीत असते."

"यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक) उभारण्यासाठी तसेच लाईट व साउंड शो सुरु करण्याबाबत "हिंदू एकता आंदोलन, सातारा" व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली आहे. उपरोक्त प्रकरणी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागविण्यात यावा." असंही पत्रात म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी