Maharashtra govt assures of probe into Mumbai residential building fire; announces Rs 5 lakh compensation to kin of deceased : मुंबई : मुंबईच्या ताडदेव परिसरात कमला या २० मजली इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागली. ही आग वेगाने पसरली. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. सर्व मृतांच्या जवळच्या नातलगांना महाराष्ट्र शासनाने पाच-पाच लाख रूपये कंपनसेशन अर्थात भरपाई देणार असल्याचे जाहीर केले. आग प्रकरणी चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून कमला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या जवळच्या नातलगांना दोन-दोन लाख रुपये मदत दिली जाईल. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल.
इमारतीला आग लागल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच २३ जण जखमी झाले. जखमींपैकी सात जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. उर्वरित १६ जखमींवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिकेने आधी सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. पण नंतर सहा जणांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेने जाहीर केले.
इमारतीला आग लागल्यामुळे जखमी झालेल्या नागरिकांपैकी काही जणांना जवळच्या हॉस्पिटलमधून दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. यामुळे उपचार सुरू होण्यास वेळ लागला आणि मृतांच्या संख्येत वाढ झाली असे वृत्त येत आहे. या प्रकरणी चौकशी करून खरच जखमींना दाखल करुन घेण्यास कोणत्याही हॉस्पिटलने नकार दिला असेल तर संबंधित हॉस्पिटलवर कारवाई होईल; असे राज्य शासन आणि मुंबई महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.