Maharashtra State Govt Cabinet Meeting : मुंबई : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Govt Cabinet Meeting) होणार आहे. (Chief Minister) मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे, परंतु या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) प्रत्यक्ष उपस्थित राहणार का? याकडे देखील लक्ष लागले आहे. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीत कोण-कोणते महत्वाचे निर्णय घेतली जातील याकडे लक्ष लागून आहे. रब्बी हंगामाच्या (Rabbi season) पार्श्वभूमीवर खतांच्या (Fertilizer) वाढत्या किमती (Prices) तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांच्या वाढत्या ईडी चौकशा यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो. शाळा सुरू करण्याबाबत आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होऊ शकतो. ओमायक्रॉनचे काही रुग्ण राज्यात देखील सापडले आहेत. कोरोनाची आकडेवारी जरी आटोक्यात असली तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय तुर्तास स्थगित केला जाण्याची शकता आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं की, स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल.
मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. इथुन पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते.
एसटी आंदोलनाला एक महिना आज पूर्ण होत आहे. राज्यातील काही भागातील एसटी सुरक्षा पुरवून सुरू होत असली तरी अद्यापही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी कर्मचारी शासनात विलिनीकरणाची मागणी घेऊन चांगलेच आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो. सेवा देणाऱ्या बसेसवर दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर देखील आज चर्चा होऊ शकते. ओबीसी आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.