Gram Panchayat Election: कोविड बाधित मतदारांना 'या' वेळेत मतदान करता येणार

Gram Panchayat Election 2021 voting: कोविड बाधित नसलेले, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल.

Maharashtra Gram Panchayat Election 2021 corona positive voters can vote half an hour before close of polling
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : कोविड-१९ (Covid-19) बाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती, तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्यापूर्वी अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करुन मतदान (Voting) करता येईल. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (State Election Commissioner U.P.S. Madan) यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान म्हणाले, कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२० रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये आता मतदानाच्या दृष्टीने अधिक स्पष्टता आणली आहे.

गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणे सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. कोविड बाधित नसलेले, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे ७.३० पासून मतदान करता येईल. 

मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा आणि साहित्य सॅटेलाईट केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्य मतादाराच्या शरीराचे तापमान विहित निकाषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदाराला टोकन दिले जाईल आणि त्याला मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलवण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी