Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: ग्रामपंचायत निवडणुकीची निकाल; गुहागरमध्ये ठाकरे गटाचा डंका,12 पैकी 11 ग्रामपंचायतीवर पेटली मशाल

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 20, 2022 | 13:25 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याने 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झाले.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: Know all details here
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज निकाल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली.
  • यात सरासरी 74 टक्के मतदान झाले आहे.
  • आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022:   राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे.शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा करिष्मा कायम रहिला असून 12 पैकी  11 ग्रामपंचायतीवर मशाल पेटली आहे. 21 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका जाहीर झाल्या होत्या. परंतु 21 पैकी 9 ग्रामपंचायत ह्या बिनविरोध झाला, यामुळे 12 ठिकाणी मतदान झालं यात ठाकरे गटाने 11 ग्रामपंचायतीवर आपली मशाल पेटवली आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती आघाडीची अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळाली आहे. दोन्ही पक्षांच्या मैत्रीवर राज्यातली पहिली ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. सरपंचपदी शिवशक्ती-भिमशक्तीचे नंदकिशोर गोरले विजयी झाले आहेत तसेच सर्वच्या सर्व सात सदस्य विजयी झाले आहेत. 

रत्नागिरी तालुक्यातील चांदोर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचा भगवा, सहा सदस्यांसह सरपंच पद ठाकरे गटाकडे गेले आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड ग्रामपंचायतीत  शिंदे गटाच्या रूपाली संकपाळ सरपंचपदी विजयी तर वेंगळ ग्रामपंचायत शिंदे गटाच्या शोभा संकपाळ सरपंच विजयी झाल्या आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा बोलबाला दिसत आहे. समोर आलेल्या निकालात बारा पैकी सात ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. पंढरपूर तालुक्यातील आजोती ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. सरपंच पदासह सर्व गट राष्ट्रवादीचे निवडून येण्यासाठी अमरजीत पवार हे आग्रही होते. त्यानुसार आरती अभिजित पवार या विजयी झाल्या आहेत. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमधील पहिला निकाल हाती आला असून येथे भाजपने गुलाल उधळला आहे. कागल तालुक्यातील बामणीत भाजपने खातं उघडलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींपैकी 19 गामपंचायतींचे निकाल हाती आले असून 12 ग्रामपंचायतींमध्ये भाजप शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. शिरोळ तालुक्यात शिंदे गटाने सर्वाधिक चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राधानगरी तालुक्यातही शिंदे गटाने खाते उघडलं आहे. 

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या (Maharashtra Gram Panchayat Election Result) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले. दरम्यान राज्यातील अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं.   (Results of Gram Panchayat Elections across the state today)

'या' ठिकाणी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34  जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याने 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झाले.  नंदुरबार जिल्ह्यात 123 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया होती. त्यापैकी सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहेत.  नांदेडमध्येही काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत.  

अधिक वाचा  :  पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 32 ग्रामपंचायती बिनविरोध

325 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यातील 32 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. 

हिंगोली  जिल्हा  

हिरडगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली झाली आहे. ही ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे.

अधिक वाचा  :  संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त फोटो व्हॉट्सअॅपवर स्टेटस्

अहमदनगर जिल्ह्यात पूर्णतः बिनविरोध 

अकोले तालुक्यातील - शिळवंडी, सोमलवाडी,नेवासा तालुक्यातील- चिंचबन,नगर तालुक्यातील-पिंपळगाव लांडगा,राहाता तालुक्यातील- लोहगाव,श्रीरामपूर,तालुक्यातील- कमालपूर, वांगी खु,श्रीगोंदा तालुक्यातील- बनपिंप्री.

बुलढाणा जिल्ह्यात 21 ग्रामपंचायत बिनविरोध 

जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायत पैकी 251 ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झालंय. 21 ग्रामपंचायत ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

जळगाव 

जवखेडा सीम, ता एरंडोल, पारोळा तालुक्यातील कराडी,राजवड, सावखेडे मराठे, ,सावखेडा होळ, ,दोधे, रावेर तालुका -धूर खेडा,अटवाडे,सिंगत, अमळनेर -चोपडाई,
नीमझरी, ब्राम्हणे, अंतुरली, रांजणे,  चाळीसगाव - डामरून, अंधारी,  जळगाव- 
सावखेडा खुर्द,सुजदे, 
चीलगाव,जामनेर, 

कोल्हापूर 

कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर चंदगड तालुक्यातील 40 पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

नाशिक 

नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये निवडणुका होणार झाल्या. 7 ग्रामपंचायती संपूर्ण बिनविरोध झाल्या असून 19 गावचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. 

रायगड

रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये महाडमधील 22, श्रीवर्धन 09, म्हसळा 07 आणि श्रीवर्धन येथील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

बीड 

बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्या. 

सांगली 

सांगली जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतींमधील 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

सोलापूर

सोलापूर निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत एकूण 189 आहेत. यामध्ये 1752 जागांवर निवडणूक झाली.  त्यापैकी 329 बिनविरोध निघाल्या आहेत. 

अहमदनगर 

अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात 1965 सदस्यांपैकी 301 सदस्य बिनविरोध झाले, तर 15 सरपंच बिनविरोध झाले. जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

अकोला 

अकोला जिल्ह्यात  266 ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली आहे. यापैकी 4 सरपंच बिनविरोध झाले आहेत तर एक संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी