Maharashtra Highest Suicide Cases: मुंबई : देशात सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. इतकेच नाही तर देशात आदल्या वर्षीच्या तुलनेत आत्महत्यांच्या प्रमाणात ६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रानंतर आत्महत्येत तमिळनाडू आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. संपूर्ण भारतात २०२१ साली १ लाख ६४ हजार ३३ आत्महत्या प्रकरणांची नोंद झाली. (maharashtra highest in suicide latest ncrb date release)
Read Also : रेल्वे क्रॉसिंगवर थोडक्यात बचावला, बाईकचा झाला चेंदामेंदा
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एक आकडेवारी जारी केली आहे. त्यात व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी, हिंसा, कौटुंबिक समस्या, मानसिक आजार, दारूचे व्यसन आणि आर्थिक नुकसानीमुळे लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. या अहवालानुसार भारतात २०२० साली १ लाख ५३ हजार ५२ जणांनी आत्महत्या केली होती. तर त्यात सहा टक्क्यांनी वाढ होऊन २०२१ साली १ लाख ६४ हजार ३३ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आली आहे.
Quick Thread: NCRB published 2021 suicide data today. Grim reading. Highlights: — 🇺🇦 Soumitra Pathare সৌমিত্র சௌமித்ரா பாடாரே (@netshrink) August 29, 2022
After ↑10% in 2020, suicides ↑7.2℅ in 2021. 164033 suicides→450 suicides/day. Suicide rate is now above 2011 rate - so all reduction gains lost. In absolute nos, 28500 suicides > 2011 +++ pic.twitter.com/4Lrjasfgld
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक म्हणजेच २२ हजार २०७ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर तमिळनाडून १८ हजार ९२५ आणि मध्य प्रदेशमध्ये १४ हजार ९६५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये १३ हजार ५००, कर्नाटकात १३ हजार ५०६ आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे केंद्रशासित राज्यांत सर्वाधिक दिल्लीत आत्महत्यांची नोंद झाली आहे. दिल्लीत २०२१ साली २ हजार ८४० आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर पुद्दुचेरीत ५०४ आत्महत्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ५३ शहरांत एकूण २५ हजार ८९१ आत्महत्यांची नोंद झाली आहे. देशात २०२१ साली एक लाख लोकसंख्येमागे १२ जणांनी आत्माहत्या केली आहे. अंदमान निकोबार बेटात आत्महत्येचा दर ३९.७ टक्के इतका आहे. त्यानंतर सिक्कीममध्ये ३९.२, पुद्दुचेरीमध्ये ३१.८, तेलंगाणात २६.९ तर केरळमध्येही २६.९ टक्के आत्महत्येचा दर आहे.
Read Also : तिन्ही फॉर्मेटमध्ये 100सामने खेळणारा विराट पहिला भारतीय
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.