HSC 2022 Result : बारावीचे निकाल जून महिन्यात जाहीर होणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 07, 2022 | 07:53 IST

Maharashtra HSC 2022 Result To Be Announced In June : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या (HSC / 12th Exam) परीक्षेचे निकाल (Result) जून २०२२ मध्ये जाहीर होणार आहेत.

Maharashtra HSC 2022 Result To Be Announced In June
बारावीचे निकाल जून महिन्यात जाहीर होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • बारावीचे निकाल जून महिन्यात जाहीर होणार
 • दहावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै २०२२च्या सुरुवातीच्या दिवसांत
 • निकाल ऑनलाइन बघता येणार

Maharashtra HSC 2022 Result To Be Announced In June : मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या (HSC / 12th Exam) परीक्षेचे निकाल (Result) जून २०२२ मध्ये जाहीर होणार आहेत. मंडळातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. दहावीच्या (SSC / 10th Exam) निकालाचे काम पण सुरू आहे. दहावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै २०२२च्या सुरुवातीच्या दिवसांत जाहीर केला जाईल. बारावी आणि दहावीचे निकाल जाहीर करण्याची तारीख बोर्डाकडून लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालांना ऑनलाइन बघता येईल. यासाठीची लिंक निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन दिली जाईल.

मागच्या वर्षी कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. दहावी आणि बारावीचे निकाल एकूण शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन करून दिले होते. महाराष्ट्रात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात बारावीचे ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. विज्ञान शाखेचे ९९.४५ टक्के, कला शाखेचे ९९.८३ टक्के आणि वाणिज्य शाखेचे ९९.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

निकाल कसा बघाल?

 1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
 2. वेबसाइटवर दहावी आणि बारावीच्या निकालांच्या स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन दिल्या जातील. या लिंक संबंधित निकालाच्या तारखेच्या दिवशी, निकाल जाहीर होण्याच्या वेळेपासून अॅक्टिव्हेट होतील.
 3. दहावीचा निकाल बघण्यासाठी दहावीच्या लिंकवर तर बारावीचा निकाल बघण्यासाठी बारावीच्या लिंकवर क्लिक करा.
 4. संबंधित वेबपेजवर विद्यार्थ्याने (परीक्षार्थी) त्याचा सीट नंबर, जन्म तारीख ही माहिती नोंदवून लॉगइन करावे. 
 5. निकाल स्क्रीनवर दिसेल. हा निकाल डाऊनलोड करून घेता येईल तसेच त्याची प्रिंट काढता येईल. 
 6. निकालाची सॉफ्ट कॉपी वेबसाइटवर मिळेल. निकालाची अधिकृत प्रत संबंधित शिक्षण संस्थेतून उपलब्ध होईल. निकालाची प्रत कधी मिळेल या संदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दिली जाईल.
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी