HSC Exams 2023: 12 वीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, प्रश्नपत्रिका सोशल मीडियात व्हायरल, पेपरफुटीवरुन विधानसभेत विरोधक आक्रमक 

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 03, 2023 | 14:06 IST

HSC Exams 2023: बारावीच्या परीक्षा सुरू असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बारावीच्या गणिताचा पेपर फुटला असल्याचं वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Representative Image
HSC Exams 2023: 12 वीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, प्रश्नपत्रिका सोशल मीडियात व्हायर, पेपरफुटीवरुन विधानसभेत विरोधक आक्रमक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा
  • बोर्डाकडून पेपरफुटीला अधिकृत दुजोरा नाही
  • पेपर व्हायरल झाल्याने बुलढाण्यात खळबळ

Reports of HSC maths paper leak: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) च्या परीक्षा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत त्रुटी असल्याचं समोर आलं होतं. त्यानतंर आता बारावीच्या गणित विषयाचा पेपर चक्क फुटला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे परीक्षा सुरू होण्याच्या अर्धातास अगोदर गणिताच्या पेपरचे फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली. 

गणित विषयाचा पेपर फुटल्याच्या वृत्ताला अद्याप बोर्डाकडून दुजोरा मिळालेला नाहीये. मात्र, एकंदरीतच प्रश्नपत्रिकेत त्रृटी आणि पेपर फुटल्याचं वृत्त या सर्व प्रश्नांवरुन विधानसभेत विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

हे पण वाचा : रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

सरकार करतंय काय, झोपलंय काय? - अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत पेपरफुटीचा प्रश्न उपस्थित करत म्हटलं, सिंदखेडराजा परिसरात बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धातास आधी फुटला आणि तो सर्वत्र प्रसिद्ध झाला. तो रॅकेट आहे की काय... अभ्यास करणाऱ्या मुलांचं किती नुकसान आहे. हे कसं सुरू आहे? सरकार काय करतंय? मला काही कळत नाहीये. काय झोपलेत की काय? पुन्हा बोलल्यावर तुम्हाला वाटतं दादा बोलतात, दादा बोलतात. मधल्या काळात सुद्धा एका पेपरचं असंच झालं होतं.

वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, बारावीच्या इंग्रजीच्या परीक्षेत प्रश्न चुकीचे आले. त्यानंतर हिंदीच्या परीक्षेतही मग मराठी पेपरच्या ऐवजी इंग्रजीचा पेपर देण्यात आला. आता ही चौथी घटना आहे. सरकारने सांगितलं की, परीक्षेच्या 10 मिनिटेपूर्वी प्रश्नपत्रिका द्यायची नाही कारण पेपर बाहेर जातो. भरारी पथक नेमलं, मोबाइलवर बंदी मग अर्थातास आधी पेपर बाहेर गेलाच कसा?

हे पण वाचा : रात्री गाढ झोप येण्यासाठी काय करावे?

संध्याकाळपर्यंत चौकशी करुन कारवाई

पेपरफुटीचा विषय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं, काही विशिष्ट भागांत कॉपीचं रॅकेट अनेक वर्षांपासून सुरू आहे. राज्य सरकारने कॉपीमुक्त अभियान सुरू केलं. भरारी पथक नेमली आहेत. हे प्रकरण खूपच गंभीर आहे की, पेपर सुरू होण्यापूर्वी तो फुटलेला आहे. या संदर्भात तात्काळ या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना देऊ. या विभागाचे मंत्री आता उपस्थित नाहीयेत पण आज संध्याकाळपर्यंत निवेदन करण्याची कार्यवाही करू.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी