Maharashtra HSC Exam 2023: बारावी बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत त्रुटी, परीक्षेतील घोळावर बोर्डाने म्हटलं...

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 22, 2023 | 13:36 IST

Maharashtra HSC Exam 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बारावी बोर्डाच्या इंग्रजी परीक्षेत तीन प्रश्नांपैकी एका प्रश्नातच उत्तर
  • इंग्रजी परीक्षेतील घोळावर बोर्ड निर्णय घेणार
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे.

Maharashtra HSC Exam 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 मार्च 2023 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. 21 फेब्रुवारी परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा होता आणि या पहिल्या पेपरमध्येच घोळ झाल्याचं दिसून आलं आहे.

12वीच्या परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजीचा होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3 आणि त्यात उपप्रश्न होते ए 3, ए 4 आणि ए 5 हे प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी थोडे गोंधळले. कारण, यामध्ये ए 3 आणि ए 5 मध्ये प्रश्नच दिलेला नव्हता. तर ए4 मध्ये कवितेच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्या खाली उत्तर सुद्धा देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थ्यामध्ये गोंधळ होता.

हे पण वाचा : Exam Tips:परीक्षेच्या वेळी करू नका या चुका

या प्रकरणात आता शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बोर्डाने सांगितले की, या त्रुटी संदर्भात आम्ही लवकरच बैठक घेऊ आणि या लवकरच उत्तर देऊ. तिन्ही प्रश्न हे सहा गुणांचे आहेत त्यामुळे सहा गुणांचा बोनस विद्यार्थ्यांना मिळणार का? याबाबत आता बोर्डाचा निर्णय अपेक्षित आहे.

बोर्डाने काय म्हटलं?

या संदर्भात शिक्षण मंडळाने एक पत्रक काढलं आहे. यामध्ये म्हटलं, "फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून आयोजित करण्यात आलेली आहे. आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडली. प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्या समवेत आयोजित करण्यात आली होती. तथापि शिक्षकांचा त्यांच्या धोरणात्मक मागण्यांबाबत बहिष्कार असल्यामुळे सदरची सभा होवू शकलेली नाही. इंग्रजी विषयात्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत मुख्य नियामकांची संयुक्त सभा पुन:श्च आयोजित करण्यात येवून इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत संयुक्त सभेचा अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी