महाराष्ट्राचा बारावीचा निकाल जाहीर, कोकणची आघाडी, मुंबईनं केलं निराश

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 08, 2022 | 14:54 IST

maharashtra hsc result 2022, mumbai result lowest result, details MSBSHSE : मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला.

maharashtra hsc result 2022, mumbai result lowest result, details MSBSHSE
महाराष्ट्राचा बारावीचा निकाल जाहीर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राचा बारावीचा निकाल जाहीर
  • बारावीच्या निकालात कोकणची आघाडी
  • बारावीच्या निकालात मुंबईनं केलं निराश

maharashtra hsc result 2022, mumbai result lowest result, details MSBSHSE : मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल ९४.२२ टक्के एवढा लागला. विद्यार्थी हा निकाल mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या वेबसाईटवर बघू शकतात. याआधी २०२१मध्ये बारावीचा निकाल ९९.६३ टक्के एवढा लागला होता. 

बारावीच्या निकालात यंदा कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागातील ९७.२१ टक्के विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विभागाचा बारावीचा निकाल राज्यात सर्वात निराशाजनक ठरला. राज्यात बारावीच्या विभागनिहाय निकालात कोकणचे सर्वाधिक परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. याउलट मुंबई विभागातून बारावीची परीक्षा देणाऱ्यांपैकी ९०.९१ टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण झाले. पुणे विभागाचा निकाल ९३.६१ टक्के एवढा लागला. 

निकालाची वैशिष्ट्ये

  1. नोंदणी करणाऱ्यांपैकी १४ लाख ३९ हजार ७३१ जणांनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ जण उत्तीर्ण झाले. बारावीच्या परीक्षेत ९४.२२ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.
  2. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागांमधून एकूण नोंदणी केलेल्या पुनर्परीक्षार्थींपैकी ३५ हजार ३६८ जण परीक्षेला बसले. यापैकी १८ हजार ७५५ जण उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ५३.०२ टक्के आहे. 
  3. नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९५.३५ असून विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यापेक्षा २.०६ टक्के जास्त आहे
  4. नोंदणी केलेल्यांपैकी ६३०१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, यापैकी ६००१ जण उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९५.२४ टक्के.
  5. बारावीच्या परीक्षेत १५३ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी