Congress : विधानपरिषद निवडणुकीत सहा काँग्रेस आमदारांकडून क्रॉस वोटिंग, या आमदारांमुळे हंडोरेंचा पराभव

२० जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्याच सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे हंडोरेंचा पराभव झाला आहे. काँग्रेसने अंतर्गत चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Chandrakant Handore
चंद्रकांत हंडोरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २० जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पाडली.
  • या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला.
  • काँग्रेसच्याच सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे हंडोरेंचा पराभव झाला आहे.

Congress MLC Election  : मुंबई : २० जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्याच सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे हंडोरेंचा पराभव झाला आहे. काँग्रेसने अंतर्गत चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. (maharashtra legislative council six congress cross voting chandrakant handore lost election)

अधिक वाचा : Maharashtra Cabinet: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 'यांना' मिळालं मंत्रिपद

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ज्यांनी क्रॉस व्होटिंग केले त्यापैकी दोन ते तीन आमदार हे मराठवाड्यातील होते. तर दोन आमदार मुंबईचे होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. गुप्त मतदान झाल्याने त्यांची नावे समोर आलेली नाहीत. असे असले तरी त्यांचा शोध घेतला जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे या नेत्याने सांगितले आहे.

अधिक वाचा : Maharashtra Cabinet Expansion: आज 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार, कोण होणार मंत्री? ; वाचा येथे 'त्या' 18 जणांची नावं

चंद्रकांत हंडोरे यांनी मुंबईचे महापौरपद आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्रिपदही भुषवले आहे. हांडोरेंसाठी २९ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. परंतु हंडोरे यांना फक्त २२ मते पडली आणि त्यांचा पराभव झाला. वरिष्ठ नेत्यांकडे या चौकशीचा अहवाल पाठवण्यात आला आहे. हा अहवाल गुप्त असून पक्षातील नेत्यांनाही हा अहवाल दाखवण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांचा सामना भाजपचे प्रसाद लाड यांच्यासोबत होता, भाई जगताप यांना १५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता परंतु त्यांना २० मते मिळाली. म्हणजेच हंडोरे यांची मते भाई जगताप यांच्या पारड्यात पडली.

अधिक वाचा : हिंगोलीच्या सभेत CM शिंदेंनी टाकलं आश्वासनच हिंग; विविध विभागांतील 80 हजार पदे भरणार, शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देणार

निवडणुकीनंतर चंद्रकांत हंडोरे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली, तसेच ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही दिला होता.

अधिक वाचा : पवार कुटुंब अडचणीत? लवासाप्रकरणी शरद पवारांसह सुप्रिया, अजित यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

इकडे विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. जेव्हा विधासभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला तेव्हा काँग्रेसचे ४४ आमदारांपैकी १२ आमदार अनुपस्थित होते. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश होता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी