diwali holiday mess दिवाळीच्या सुट्टीचा गोंधळ, विद्यार्थी संभ्रमात

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 28, 2021 | 23:18 IST

महाराष्ट्र शासन आणि राज्याचा शिक्षण विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. राज्यातल्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे दोन वेगवेगळे कालावधी जाहीर झाले आहेत. यामुळे नेमकी सुट्टी कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसापर्यंत असा संभ्रम निर्माण झाला आहे.

maharashtra : mess in declaration of diwali holiday
दिवाळीच्या सुट्टीचा गोंधळ, विद्यार्थी संभ्रमात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दिवाळीच्या सुट्टीचा गोंधळ, विद्यार्थी संभ्रमात
  • दिवाळीची सुट्टी आधी १ ते २० नोव्हेंबरपर्यंत जाहीर
  • दिवाळीची सुट्टी नंतर २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यंत जाहीर

मुंबईः महाराष्ट्र शासन आणि राज्याचा शिक्षण विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. राज्यातल्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे दोन वेगवेगळे कालावधी जाहीर झाले आहेत. यामुळे नेमकी सुट्टी कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसापर्यंत असा संभ्रम निर्माण झाला आहे. maharashtra : mess in declaration of diwali holiday

दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक (उत्तर,पश्चिम, दक्षिण) कार्यालयाने १ ते २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना सुट्टीची सूचना देण्यात आली. शाळांच्या सत्र परीक्षा ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत संपतील. 

नियोजनानुसार शाळांचे कामकाज सुरू असताना राज्याचे सह सचिव राजेंद्र पवार यांच्या सहीने एक परिपत्रक शासनाने काढले. या परिपत्रकानुसार दिवाळीची सुट्टी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर अशी आहे. यामुळे परीक्षांचे नियोजन कोलमडले आहे. ज्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या २० नोव्हेंबर पर्यंतच्या सुट्ट्यांचा विचार करुन बाहेरगावी जाण्याचे नियोजन आणि आरक्षण (रिझर्व्हेशन/बुकिंग) केले आहे त्यांची पंचाईत झाली आहे.

सुट्ट्यांबाबत निर्माण झालेल्या गोंधळाचा मुद्दा उपस्थित करुन शिक्षक भारती संघटनेने दिवाळीची सुट्टी आधी ठरल्याप्रमाणे १ ते २० नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी देण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी