मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या (corona virus) जागतिक संकटाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या (corona infections) संख्येत झपाट्याने वाढ (increase) होताना दिसत आहे. याच दरम्यान महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ कालच शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह एका विवाहसोहळ्यात (marriage) उपस्थित होते.
छगन भुजबळ यांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांच्याशी संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या ट्वीट संदेशात त्यांनी म्हटले आहे की आता त्यांची तब्येत ठीक आहे आणि सर्वांनी आपली काळजी घ्यावी. तसेच त्यांनी लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचा सल्लाही दिला आहे.
छगन भुजबळ हे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह एका विवाहसोहळ्याला उपस्थित होते. शरद पवार यांनी नुकतेच ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना केलेल्या विनंतीनुसार त्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातल्या जवळपास पाच मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात जयंत पाटील, बच्चू कडू, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे आणि आता छगन भुजबळ यांचा समावेश आहे. कोरोनाच्या संकटाच्या सर्वोच्च बिंदूवर जेव्हा गेल्यावर्षी महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला होता तेव्हाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अऩेक मंत्री आणि राजकीय नेत्यांना या विषाणूची लागण झाली होती. त्यातील बहुतेकजण आता बरे होऊन पुन्हा कामावर परतले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.