Sanjay Rathod: "कितीवेळा अशी बदनामी करणार? असेच सुरू राहणार असेल तर..."

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 10, 2022 | 18:54 IST

Sanjay Rathod reaction on Chitra Wagh statement: शिंदे गटात सहभागी झालेल्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आणि त्यावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासह विरोधकांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. 

Maharashtra minister sanjay rathod first reaction after allegation from chitra wagh politics news read in marathi
Sanjay Rathod: कितीवेळा अशी बदनामी करणार? असेच सुरू राहणार असेल तर... 
थोडं पण कामाचं
  • कितीवेळा अशी बदनामी करणार, माझ्या कुटुंबाला याचा प्रचंड त्रास - संजय राठोड  
  • त्या प्रकरणाशी माझा संबंध नाहीये - संजय राठोड 
  • चौकशीअंती मला पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली होती - संजय राठोड 

Sanjay Rathod: ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना झालेल्या आरोपांनंतर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता सत्तांतर होताच संजय राठोड यांना पुन्हा राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्यात आल्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबतच विरोधकांनीही शिंदे-फडणवीस सराकारवर निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर, चित्रा वाघ यांनी आपला लढा असाच सुरू राहणार असल्याचंही म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर संजय राठोड यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra minister sanjay rathod first reaction after allegation from chitra wagh politics news read in marathi)

संजय राठोड यांनी म्हटलं, लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्राताईंना माहिती नसेल... या संदर्भातील हे सर्व कागदपत्रे त्यांना पाठवण्याची व्यवस्था आम्ही करू. खऱ्या अर्थाने पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास होता. मी आतापर्यंत शांत होतो. सर्व सत्य समोर आलं आहे. लोकशाहीत बोलम्याचा अधिकार सर्वांना आहे पण विचार करुन बोलावं.

माझा सुद्धा परिवार आहे, पत्नी आहे, मुलं-बाळ आहेत. वयोवृद्ध आई-वडील आहेत. त्यामुळे आपणही विचार केला पाहिजे की, किती त्रास होतो?. मी सुद्धा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलो आहे. असं असतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतक्या प्रचंड मतांनी लोकांनी निवडून दिलं नसतं असंही राठोड म्हणाले.

अधिक वाचा : Maharashtra Cabinet decision: पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

वेळ आली तर कायदेशीर मार्ग वापरणार 

मंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, आतापर्यंत मी शांत होतो. पण यानंतर अशाच पद्धतीने वातावरण सुरू राहिलं तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे. कायदेशीररित्या नोटीसही देणार आहे. माझ्याविरोधात एफआयआर दाखल करा अशी याचिका दोनवेळा दाखल झाली पण पुणे कोर्टाने त्या फेटाळल्या. कुठलीही एफआयआर नाही. कुठलीही तक्रार माझ्या विरोधात नाही. तरी माझ्यावर आरोप झाले आणि आरोप झाल्याने मी स्वत:हून मंत्रिपदावरुन बाजूला झालो.

मंत्री म्हणून पुन्हा मला जबाबदारी मिळाली आहे. जी काही मंत्रिपदाची जबाबदारी मिळेल त्यातून चांगल्या पद्धतीचे काम महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी करायचं आहे. जी जबाबदारी मुख्यमंत्री सोपवतील ती पूर्ण पार पाडेल असंही संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी