Maharashtra Ministers bungalow list: राज्यात सत्तांतर झाल्यावर नव्याने नियुक्ती झालेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शासकीय बंगले / निवासस्थानाचे वाटप करण्यात आले आहे. (Maharashtra ministers bungalow allotment see which bungalow is for whom)
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 'शिवगीरी' या शासकीय बंगल्याचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यावर ज्याप्रकारे मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी आणि फिल्डिंग लावली जाते. त्याचप्रकारे मंत्री झाल्यावर आपल्या आवडता बंगला मिळावा यासाठीही अनेकजण आग्रही असतात. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर आता कोणता बंगला कोणत्या मंत्र्याला मिळणार यावरुन काही दिवसांपासून चर्चा रंगत होती. अखेर राज्य शासनाने शासन निर्णय काढत बंगल्याचे / शासकीय निवासस्थानाचे वाटप केले आहे.
अधिक वाचा : तर मी एवढा मोठा, करेक्ट कार्यक्रम केलाच नसता: मुख्यमंत्री
मंत्री महोदयांनी पदावरुन मुक्त झाल्यावर त्यांना वाटप केलेले निवासस्थान पंधरा दिवसांच्या कालावधीत रिक्त करुन देणे बंधनकारक राहील असेही शासन निर्णयात म्हटलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.