Sudhir Munghantiwar on Aaditya Thackeray: देशाचा 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असताना राज्यातील आदिवासी विभागातील समस्यांवरुन दिलीप वळसे पाटील आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रश्न मांडला. दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी कुपोषणामुळे मृत्यू सुरू असल्याचा प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात उत्तर देताना मंत्री विजयकुमार गावित यांनी म्हटलं की, कुपोषणामुळे एकही मृत्यू झालेला नाहीये. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, हे वस्तूस्थितीला धरून नाहीये आणि कुपोषणामुळे मृत्यू संदर्भात सत्य समोर आलं पाहिजे. या संदर्भात मंत्र्यांना अद्यापही सुधारित उत्तर द्यायचं असेल तर देऊ शकतात.
त्यानंतर विजयकुमार गावित यांनी पुन्हा म्हटलं, मी उत्तर दिलं आहे त्यात कोणताही बदल नाहीये. ही गोष्ट खरी आहे की, हायकोर्टात पीआयएल दाखल झालेली आहे. पीआयएलमधील मुद्द्यांच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यात विविध आजारांनी मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, मंत्री महोदय अद्यापही सभागृहाची दिशाभूल करत आहेत.
अधिक वाचा : "शिवछत्रपतींची शपथ तुम्हाला..." CM ची शेतकऱ्यांना भावनिक साद
त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आदिवासी भागातील समस्यांचा मुद्दा उपस्थित केला. आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा-जेव्हा आपण आदिवासी विभागात जातो तिथे गेल्यावर आपल्याला राजकारणी व्यक्ती म्हणून तिथली परिस्थिती पाहून आपल्याला लाज वाटली पाहिजे. कुपोषण नाहीचय हे सांगितलं जात आहे. आदिवासी समाजाला आपण न्याय देणार आहात की नाही आणि कुपोषणासारख्या महत्त्वाच्या विषयाला आपण उत्तर देणार आहात का, काहीतरी सुधारणार आहात का?
आदित्य ठाकरे यांच्या लाज वाटली पाहिजे या विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या सभागृहाच्या काही प्रथा, परंपरा आहेत. भावनेच्या भरात त्यांनी लाज वाटली पाहिजे हा शब्द उच्चारला आपल्याकडे लाज वाटली पाहिजे हा शब्द असंसदीय शब्दांच्या यादीत आहे. त्यामुळे आपण सन्माननीय सदस्यांना ताकीद द्यावी नाही तर त्यांनी शब्द मागे घ्यावा. ही प्रथा-परंपरा झाली तर उद्या प्रत्येक उत्तरात मागील दोन वर्षांच्या प्रश्नांवर मी म्हणेल, सरकारला लाज वाटली पाहिजी. त्यामुळे हे शब्द उपयोगात आणले जाऊ नयेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.