Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज तिसरा दिवस आहे. 17 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून 17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात हंगामा होण्याची शक्यता आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. आरोग्य व्यवस्था तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं चित्र दुसऱ्या दिवशी पाहायला मिळालं होतं.
हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं. विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी झाली.
Read Also : UPI पेमेंट विनामूल्यच राहणार : केंद्रीय अर्थ मंत्रालय
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला.
Read Also : पाकिस्तान : माजी PM इमरान खान यांच्या अटकेची शक्यता
पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.