उध्दवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणे सोडत नाही - फडणवीस

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 04, 2022 | 16:46 IST

Maharashtra Nagpur Devendra Fadanvis taunt cm Uddhav Thackeray And Amruta Fadanvis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता फडणवीस यांच्यात एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींवर बोलणे सोडत नाही, असे महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गमतीने म्हणाले. 

Maharashtra Nagpur Devendra Fadanvis taunt cm Uddhav Thackeray And Amruta Fadanvis
उध्दवजी टोमणे मारणे सोडत नाहीत - फडणवीस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उध्दवजी टोमणे मारणे सोडत नाहीत - फडणवीस
  • माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणे सोडत नाही - फडणवीस
  • देवेंद्र फडणवीस गमतीने म्हणाले

Maharashtra Nagpur Devendra Fadanvis taunt cm Uddhav Thackeray And Amruta Fadanvis : मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता फडणवीस यांच्यात एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींवर बोलणे सोडत नाही, असे महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गमतीने म्हणाले. 

OBC Resrvation: एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा, Supreme Court चे आदेश

अमृता फडणवीस गाणी गातात. यावरून उद्धव ठाकरेंनी टोमणा मारला होता. महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव गातात हे मला आदित्यने सांगितले होते. आजवर एकच व्यक्ती गाते असे वाटत होते असे ठाकरे म्हणाले होते. यावर उत्तर देताना मला वाटलं होतं, अब्जाधिश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे; असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. या शाब्दिक जुगलबंदीबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी गमतीने उत्तर दिले. काय बोलायचं काय नको, हा त्या दोघांचा प्रश्न आहे, असंही सांगायला देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलले फडणवीस

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अद्याप मी पाहिलेला नाही! पण, प्राथमिक माहितीनुसार, कार्यकाळ ५ वर्ष पूर्ण झाला आणि सहा महिन्यांहून अधिक प्रशासक ठेवता येत नाही. या कारणामुळे अशा सर्व ठिकाणी निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे संपूर्णत: महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. दोन वर्ष या सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले. ट्रिपल टेस्ट केली नाही. त्यामुळेच अशाप्रकारचा निकाल आला. न्यायालयाने नवीन कायदा रद्द केला नाही. पण, सरकारच्या कार्यपद्धतीवर मात्र तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. या निर्णयामुळे ओबीसींची अपरिमित हानी होणार आहे. योग्य भूमिका महाविकास आघाडी सरकारने कधीच मांडलेली नाही. जी कार्यवाही करायला हवी होती, ती सुद्धा केलेली नाही. हा संपूर्ण निकाल आम्ही समजून घेऊ आणि त्यानंतर पुढील भूमिका मांडू; असे फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी