महाराष्ट्र एनसीसीने पटकावला पंतप्रधान ध्वज

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 28, 2022 | 16:32 IST

Maharashtra NCC won PM’s flag : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बॅनर) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुचे अभिनंदन केले. 

Maharashtra NCC won PM’s flag
महाराष्ट्र एनसीसीने पटकावला पंतप्रधान ध्वज 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र एनसीसीने पटकावला पंतप्रधान ध्वज
  • मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
  • महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक

Maharashtra NCC won PM’s flag : मुंबई :  ‘महाराष्ट्राच्या जिद्द आणि चिकाटीचा झेंडा दिल्लीत फडकवलात..छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा वारसा सांगणारी कामगिरी बजावलीत...शाब्बास..भले बहाद्दर...’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बॅनर) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुचे अभिनंदन केले. 

राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने देशातील सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे, त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र संचालनालयाचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमुला पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बॅनर) प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. 

महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. या यशासाठी पृथ्वी हिचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

पंतप्रधान ध्वजाचा (प्राईम मिनीस्टर बॅनर) वाहक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, सर्वोत्कृष्ट संचालनालयासाठीचा पारितोषिक स्वीकारण्याचा मान मिळालेले महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी