Rain in Maharashtra : राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २८ जिल्ह्यांना फटका, ११० जणांचा मृत्यू;  NDRF & SDRF च्या १४ तुकड्या तैनात

जुलै महिन्यात  राज्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. असे असले तरी या पावसामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांना फटका बसला आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला असून २१८ प्राणी दगावले आहेत. तसेच १४ हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

NDRF
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जुलै महिन्यात  राज्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.
  • असे असले तरी या पावसामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांना फटका बसला आहे.
  • राज्यातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला असून २१८ प्राणी दगावले आहेत.

Rain in Maharashtra : मुंबई : जुलै महिन्यात (july month) राज्यात मुसळधार पाऊस (heavy rain) झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात (august month) पावसाने विश्रांती घेतली आहे. असे असले तरी या पावसामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांना (24 district) फटका बसला आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू (110 people deah) झाला असून २१८ प्राणी दगावले आहेत. तसेच १४ हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पावसाचा अंदाज पाहता राज्य सरकारने राज्यात एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफच्या (SDRF) १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. (maharashtra ndrf and sdrf 14 teams 110 people died due to heavy rain maharashtra)

अधिक वाचा : Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण, या दिवशी उद्घाटन होण्याची शक्यता


राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१,रायगड- महाड- २, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण-२,कोल्हापूर-२,सातारा-१,  या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ पथके तैनात आहेत. नांदेड-१, गडचिरोली-१ अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) एकूण दोन तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

अधिक वाचा : Maharashtra Weather forecast: पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे, 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार बरसणार

२८ जिल्ह्यांना पावसाचा फटका 

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व ३१३ गावे प्रभावित झाली आहेत. ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत.४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.

अधिक वाचा : FIR against Raut: पोलिसांनी स्वप्ना पाटकरकडून मागवला खरा मूळ ऑडिओ, संजय राऊतांनी दिली होती खून आणि बलात्काराची धमकी
 

५ ऑगस्टपासून मुसळधार पावसाची शक्यता

जुलै महिन्यात चांगलाच पाऊस कोसळला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु ५ ऑगस्टपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि कोकणात ५ ऑगस्टपासून जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस पडेल. गेल्या एक आठवड्यापासून मुंबईत पाऊस न पडल्याने शहराचे तापमान २ अंश डीग्री सेल्सियसने वाढले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी पुढील पाच दिवसांत राज्यात विजांच्या गडगटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच  कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. 

अधिक वाचा : Uddhav Thackeray: 'मला संजय राऊताचा अभिमान, हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक', उद्धव ठाकरेंची भाजपवर तुफान टीका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी