Breaking News : केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

Breaking News : केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

ketaki chitale
Breaking News : केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात, जितेंद्र आव्हाड यांची माहिती 
थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे.
  • ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे.

Ketaki Chitale :मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे.  

शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे. 

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर  मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन  फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l  तू तर लबाडांचा लबाड ll

 

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे...

Posted by Ketaki Chitale on Friday, May 13, 2022


अशी पोस्ट केतकीने ऍडव्होकेट नितीन भावे याच्या नावाने शेअर केली होती. त्यानंतर राज्यात एकच वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी सर्वात प्रथम कळवा पोलीस स्थानकात केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बीड आणि पुण्यातही केतकीविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादीच्या नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करणार आहेत.

राज ठाकरे यांची केतकीवर टीका

राज ठाकरे यांनीही केतकीला खडे बोल सुनावले आहे. एक पोस्ट जारी करून राज ठाकरे यांनी केतकी चितळेचा समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की,  कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत..! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे.असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी