Police Recruitment: नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती, आता पुढे काय? वाचा सविस्तर...

मुंबई
सुनिल देसले
Updated Oct 29, 2022 | 17:40 IST

Maharashtra Police Bharati: राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीच्या संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली
  • राज्य राखीव दलातील पोलीस शिपाई भरती पुढे ढकलली
  • पुढील आठवड्यात नवीन तारीख जाहीर करण्याची शक्यता

Maharahstra Police Recruitment: राज्यात पोलीस भरतीच्या संदर्भातील जाहिरात शिंदे-फडणवीस सरकारने काढली मात्र, अवघ्या काही तासांतच या भरती प्रक्रियेला पुन्हा स्थगिती देण्यात आली. राज्यात होणारी पोलीस भरती तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती. जवळपास 14956 पदांसाठी  ही भरती प्रक्रिया होणार होती. मात्र, आता या भरती प्रक्रियेला स्थगिती करण्यात आली आहे. (Maharashtra Police Recruitment 2022 government stayed on bharti process what is next read details in marathi)

या संदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील जाहिरात देणअयाबाबतची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे. सदरची जाहिरात देण्याबाबतचा दिनांक यथावकाश कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा : एकांतात असाल तरच पाहा या बोल्ड वेब सीरिज

भरती प्रक्रिया स्थगित करण्यामागचं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून कोरोना काळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी देण्याबाबत विचार सुरू आहे. सरकारकडून वयोमर्यादा वाढवून देण्यावर विचार सुरू आहे. त्यामुळेच या भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. तसेच या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सुधारित तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे पण वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक धोकादायक रास कोणती? वाचा

राज्यात दीर्घकाळापासून पोलीस भरती प्रक्रिया पार पडलेली नाहीये. कोरोना काळात थांबलेली भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरू होणार होती. त्या संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने जाहिरात सुद्धा काढली मात्र, लगेचच या भरतीला स्थगिती दिली. भरती प्रक्रियेची जाहिरात काढण्यात आल्याने इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, आता पुन्हा भरतीला स्थगिती दिल्याने इच्छुक तरुणांमध्ये पुन्हा नाराजीचे वातावरण आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी