मोठी बातमी ! शिंदे गोटातून 21 आमदारांची होणार घरवापसी

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 23, 2022 | 15:24 IST

Maharashtra political crisis: महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढत असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Maharashtra political crisis at least 18 mla in guwahati contacted shiv sen and they will return soon said sanjay raut
मोठी बातमी ! शिंदे गोटातून 21 आमदारांची होणार घरवापसी 
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांची वर्षा बंगल्यावर एक बैठक बोलावली होती. या बैठकीत १५ आमदार उपस्थित होते.
  • इतर तीन आमदार आपल्या मतदारसंघात आहेत. या आमदारांसोबतच्या बैठकीनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा दावा केला आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेचे तब्बल ३५ आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून इतर सात अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या संख्येत वाढ होत असल्याने महाराष्ट्रातील ठाकरे सरकार (Thackeray Government) अडचणीत येताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) टिकणार की जाणार यावरुन विविध चर्चा सुरू आहेत. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (२२ जून) फेसबूक लाईव्ह करत सर्व आमदारांना भावनिक आवाहन केलं. मात्र, असे असतानाच आज (२३ जून) शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटीला (Guwahati) रवाना झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या आणखी वाढली. पण असे असातानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांची वर्षा बंगल्यावर एक बैठक बोलावली होती. या बैठकीत १५ आमदार उपस्थित होते. तर इतर तीन आमदार आपल्या मतदारसंघात आहेत. या आमदारांसोबतच्या बैठकीनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत? 

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, जरी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री नसले तरी आम्ही सर्व इथे ठाण मांडून बसलो आहोत. कारण आम्हाला सर्वांना विश्वास आहे की, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा वर्षां बंगल्यावर येतील. गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जे सुरू आहे. त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शिवसेनेचे दोन आमदार कैलास पाटील (Kailas Patil), नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हे इथे उपस्थित आहेत. यापैकी एक आमदार सुरतहून (Surat) तर दुसरे गुवाहाटीहून आले आहेत. इथे येण्यासाठी त्यांना जो संघर्ष करावा लागला, जी जोखीम पत्करावी लागली ती संपूर्ण कहाणी थरारक आणि रोमांचक आहे.

अपहरण करुन, फसवूण आपल्या कब्ज्यात भाजपने नेलं. तिथं नेऊन गुलाम बनवण्याचं काम सुरू आहे. आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांना आपल्यासमोर आणलं आहे की त्यांना सांगाव महाराष्ट्राला, देशाला की कशाप्रकारे राजकारण सुरू आहे. राजकारणाने किती खालच्या स्तरावरची पातळी गाठली आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

२१ आमदार स्वगृही परतणार

संजय राऊत यांनी पुढे म्हटलं, त्यांच्या ताब्यातील २१ आमदारांसोबत आमचा संपर्क झाला आहे. कुणी कितीही फोटो, व्हिडीओ पाठवावेत... पत्ते खेळताना, जेवताना, खाताना-पिताना. पण ज्या दिवशी ते मुंबईत येतील त्यादिवशी त्या दिवशी त्यातील २१ आमदार शिवसेनेचे असतील. या सर्वांसोबत उद्धव ठाकरेंचा व्यवस्थित संपर्क झाला आहे. उद्या जर विधानसभेत फ्लोअर टेस्टचा जरी विषय आला तरी विजय महाविकास आघाडीचाच होईल हा आम्हाला विश्वास आहे.

एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन

तर तिकडे गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबतचा एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी