Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख करत मानले मतदारांचे आभार

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट करत बंडखोरी केल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरू झाला आहे. त्याच दरम्यान आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. 

Maharashtra Political crisis cm eknath shinde taunts to uddhav thackeray over gram panchayat election result
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख करत मानले मतदारांचे आभार 
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
  • राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट

Eknath Shinde tweet: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरू झाला आहे. इतकेच नाही तर हा वाद आता थेट सुप्रीम कोर्टातही पोहोचला आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष सुरू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. (Maharashtra Political crisis cm eknath shinde taunts to uddhav Thackeray over gram panchayat election result)

राज्यातील ग्रामपंचायतीसाठी नुकतेच मतदान प्रक्रिया पार पडली आणि या निवडणुकीचे निकाल ५ ऑगस्ट रोजी जाहीर झाले. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. या निवडणूक निकालांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सरकारला जनतेचा कौल... शिवसेना-भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार..."

अधिक वाचा : Shinde-Thackeray-BJP : शिंदे गटाचा भाजप आणि ठाकरे गटाला धक्का 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासोबतच एक फोटोही ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये राज्यातील २७१ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाल्याचं सांगत कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या त्याचं ग्राफिक्स आहे. या ग्राफिक्समध्ये उद्धव ठाकरे गट असा उल्लेख केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे गट असा उल्लेख एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे.

मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे

राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या पदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ अस्तित्वात नाहीये. त्यामुळे नागरिकांची कामे रखडून पडली आहेत. या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सातत्याने शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. त्याच दरम्यान आता मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा प्रकारचे आदेशच मुख्य सचिवांनी सर्व विभागाच्या सचिवांना दिलेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी