Eknath Shinde: किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर, हात जोडून एकनाथ शिंदेंना म्हणाल्या....

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 21, 2022 | 20:34 IST

Kishori Pednekar appeal Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. 

Maharashtra political crisis shiv sena leader kishori pednekar cried and appeal Eknath shinde return in party
Eknath Shinde: किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर, हात जोडून एकनाथ शिंदेंना म्हणाल्या....  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे बाळासाहेबांनाही वेदना होत आहेत - किशोरी पेडणेकर
  • भाजपच्या अमिषाला बळी पडू नका, किशोरी पेडणेकरांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असून त्यांनी बंड पुकारत सुरतमध्ये दाखल झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. यानंतर शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला असून शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रविंद्र फाटक (Ravindra Phatak) हे दोन्ही नेते एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यासाठी थेट सुरतमध्ये (Surat) दाखल झाले. नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास तासभर चर्चा सुद्धा केली. मात्र, यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती समोर आली नसली तरी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच दरम्यान मुंबईत शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. शिवसैनिकांनी मुंख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्याबाहेर आणि शिवसेना भवनाबाहेर गर्दी केल्याचं दिसून येत आहे. तर तिकडे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर या भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, एकनाथ शिंदे सांहेबांसोबत किती आमदार आहेत याच्याशी आम्हाला देणं घणं नाहीये. या घटनेमुळे बाळासाहेब ठाकरे यांनाही वेदना होत आहेत असं दिसत आहे. बाळासाहेबांच्या प्रतिमेजवळील लाईट्स हलतोय... या वेदना आम्हाला आत्मक्लेश होत आहेत. कोविड काळात संपूर्ण देशभरात मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं. शांत नेत्रृत्व, सर्वांना मान-सन्मान देणारं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे. जेव्हा-जेव्हा शिवसेनेतून लोक बाहेर पडले तेव्हाही अशाच प्रकारे आरोप झाले होते. कालपासून एक मेलोड्रामा सुरू झाला तो आम्हा शिवसैनिकांना आत्मक्लेश देणारा आहे. आनंद झाल्यावर आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी येतो आणि आज दु:खाची बाब असतानाही आम्ही बाळासाहेबांच्या चरणी आलो आहोत असं म्हणत किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाले.

हात जोडून विनंती....

किशोरी पेडणेकर यांनी पुढे म्हटलं, मी एकनाथ शिंदेंना काही सांगण्याइतकी नक्कीच मोठी नाही. पण निष्ठावंत सैनिक म्हणून नक्कीच विनंती करेल की ज्या पद्धतीने भाजपची जी काही गाजरं दाखवण्याची काम सुरू आहेत त्याला बळी पडू नका... आपल्या घरी परत या... हिंदुत्व कधीच सोडलेलं नाहीये, शिवसेना हिंदुत्व सोडू शकत नाही. हेच हिंदुत्व उद्धवजी, आदित्यजी आपण सर्व सैनिक घेऊन पुढे जात आहोत. या संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारला अस्थिर करण्याचं काम सुरू आहे. घराला फोडण्याचं जे काही काम सुरू आहे त्याला बळी पडू नका. उद्धवजी तुमच्यासाठी नक्कीच चांगला निर्णय घेतील असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

वर्षा बंगल्यावर खलबतं

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका सुरू असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येही खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या एकमेकांसोबत बैठकांचा सिलसिला सुरू झाला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीहून मुंबईला तातडीने निघाले असून थोड्याच वेळात मुंबईत दाखल होतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी