Eknath Shinde: तीन महत्त्वाच्या 'जोर बैठका', एकनाथ शिंदेंचं बंड होणार का थंड?

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 21, 2022 | 18:52 IST

Maharashtra political crisis Eknath Shinde upset: एकनाथ शिंदे शिवसेनेच्या काही आमदारांसह गुजरातमध्ये दाखल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. त्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.

Maharashtra Minister Eknath Shinde
Eknath Shinde: तीन महत्त्वाच्या 'जोर बैठका', एकनाथ शिंदेंचं बंड होणार का थंड?  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात राजकीय भूकंप, शिवसेनेचे अनेक नेते नॉट रिचेबल
  • एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातारवण चांगलेच तापले
  • महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी शरद पवार मैदानात

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेच्या आमदारांसोबत रात्रीपासून नॉटरिचेबल झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे सुरत येथील Le Meridien hotel हॉटेलमध्ये  असल्याचं समोर आलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातारवण चांगलेच तापले असून एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर मुंबईतही राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. मुंबईत महत्त्वाच्या बैठका होत असून या बैठकीत काय घडतं त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

एकनाथ शिंदेंचं बंड होणार का थंड?

एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेला निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रविंद्र फाटक थेट सुरतमध्ये दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे आणि नार्वेकर-फाटक यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीनंतर एकनाथ शिंदे हे नेमकं काय पाऊल उचलणार आणि शिंदेंचं बंड पुन्हा थंड होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दुपारच्या सुमारास ट्विट करत म्हटलं, "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेशाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही"

मुंबईत शिवसेनेची बैठक

तर दुसरीकडे मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नेते, आमदारांची एक महत्त्वाची बैठक होत आहे. यापूर्वी दुपारच्या सुमारास शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक उद्धव ठाकरेंनी घेतली होती आणि या बैठकीत मविआ सरकारला कुठलाही धोका नसल्याचा दावाही उद्धव ठाकरेंनी केला होता. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत नार्वेकरांनी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे आमदारांना काय संदेश देतात हे पहावं लागेल.

वर्षावर खलबतं, मविआ वाचवण्यासाठी पवार मैदानात

तर संध्याकाळी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीहून तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात शरद पवार मुंबईत दाखल होणार असून वर्षा निवासस्थानी मविआच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार का? बहुमत सिद्ध करावं लागलं तर किती आमदारांचं संख्याबळ? एकनाथ शिंदे यांची घरवापसी करण्यासाठी काय करता येईल या सर्व मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी