BREAKING: मंत्रिमंडळाची बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 22, 2022 | 16:09 IST

Maharashtra political crisis: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आपल्यासोबत ४० आमदारांचं समर्थन असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग
  • आपल्यासोबत ४० आमदारांचे समर्थन असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांचा गट असल्याचा दावा केला जात आहे. गुवाहाटी येथे हे सर्व आमदार असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांचा गट असल्याचे व्हिडीओ आणि फोटोज समोर आले आहेत. त्याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट करत विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha) बरखास्त करण्याबाबतचं ट्विट केलं. यानंतर दुपारच्या सुमारास राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेकडून एक पत्रक काढण्यात आलं आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीची सूचना या पत्रकातून करण्यात आली आहे. या पत्रता म्हटलं, आहे,

शंभूराज देसाई, आमदार पाटण विधानसभा, 

पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. २२ जून, २०२२ रोजी, वर्षा बंगला, माऊट प्लेझंट रोड, मुंबई ४००००६ येथे सायंकाळी ०५.०० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्सअॅप आणि एस. एम. एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही.

सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

शिवसेनेकडून हे पत्रक काढून बंडखोरी केलेल्या आमदारांना शेवटची संधी दिली आहे. जर हे आमदार पुन्हा स्वगृही परतले नाहीत तर शिवसेनेकडून या आमदारांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेतच शिवसेनेने दिले आहेत. आता या पत्रावर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थनार्थ गुवाहाटी येथे असलेले आमदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी