खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत, CM शिंदेंना दिला पाठिंबा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 11, 2022 | 21:27 IST

Maharashtra Political Crisis Shivsena MP Gajanan Kirtikar Leaves Uddhav Thackeray Faction To Join CM Eknath Shinde Balasahebanchi Shivsena : लोकसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर खासदार किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला.

Gajanan Kirtikar
खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत, CM शिंदेंना दिला पाठिंबा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत, CM शिंदेंना दिला पाठिंबा
 • पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात
 • एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोकसभेतील खासदारांची संख्या 13

Maharashtra Political Crisis Shivsena MP Gajanan Kirtikar Leaves Uddhav Thackeray Faction To Join CM Eknath Shinde Balasahebanchi Shivsena : लोकसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर खासदार किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम मुंबईत रवींद्र नाट्यमंदिर येथे झाला. 

खासदार गजानन किर्तीकर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोकसभेतील खासदारांची संख्या 13 झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेत 6 आणि राज्यसभेत 3 असे 9 खासदार उरले आहेत. 

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या लोकाधिकार समिती महासंघाचा कार्यक्रम झाला. गजानन किर्तीकर लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष आहेत. पण महासंघाच्या कार्यक्रमाला किर्तीकर गैरहजर होते. या गैरहजेरीवरून चर्चेला उधाण आले होते. मुंबईत दसरा मेळाव्यात गजानन किर्तीकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी मीडियासमोर व्यक्त केली होती. या दोन घटनांमुळे गजानन किर्तीकर उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडणार अशी शक्यता व्यक्त होत होती. अखेर आज (शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022) ही शक्यता प्रत्यक्षात आली. 

Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

भारतीयांना 719 रुपयांत मिळेल ट्विटरची ब्ल्यू टिक

गजानन किर्तीकर यांची राजकीय कारकिर्द

 1. 1990, 1995, 1999, 2004 - विधानसभा निवडणुकीत विजय, 4 टर्म मालाड मतदारसंघातून आमदार झालेले नेते
 2. 2014 आणि 2019 - लोकसभा निवडणुकीत विजय
 3. 1995 ते 1998 - महाराष्ट्र शासनाचे गृहराज्यमंत्री, पर्यटन खात्याचे राज्यमंत्री
 4. 1998 ते 1999 - महाराष्ट्र शासनाचे माहिती, जनसंपर्क, वाहतूक या खात्यांचे कॅबिनेट मंत्री.  
 5. 2006 - स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष
 6. 2007 पासून - शिवसेना नेते
 7. 2010 - मुंबई उपनगर कबड्डी परिषदेचे अध्यक्ष
 8. गजानन किर्तीकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुरुदास कामत यांचा 1 लाख 83 हजार मतांनी केला पराभव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी