Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 11, 2022 | 06:46 IST

महाराष्ट्रात गमिनी कावा करून भाजप- शिंदे गटाने आणलेल्या सरकारसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. हे सरकार राहणार का नाही याचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. त्यांचं निलंबन होणार किंवा नाही हे आज कळेल. परंतु न्यायालयात ही सुनावणी सुनावणी आज होणार की नाही याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. 

Why Shinde government will survive or drown, Supreme Court hearing today
शिंदे सरकार टिकणार का बुडणार,सर्वोच्च न्यायलयात आज सुनावणी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे
  • आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि या प्रकरणातील इतर याचिकांची सुनावणी आज
  • सुनावणीत आपलाच विजय होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात गमिनी कावा करून भाजप- शिंदे गटाने आणलेल्या सरकारसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. हे सरकार राहणार का नाही याचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. त्यांचं निलंबन होणार किंवा नाही हे आज कळेल. परंतु न्यायालयात ही सुनावणी सुनावणी आज होणार की नाही याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. 

या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. कामकाजात समाविष्ट नसेल तर वकील आज सकाळी न्यायालयासमोर हे मॅटर मेन्शन करतील. त्यानंतर सुनावणी कधी होणार हे स्पष्ट होईल. सकाळी मेन्शन केलेलं मॅटर त्याच दिवशी सुनावणीला येण्याची शक्यता खूप कमी असते. आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि या प्रकरणातील इतर याचिकांची सुनावणी 11 तारखेला होणार असं सुप्रीम कोर्टानं जाहीर केलं होतं. 

Read Also : नोव्हाक जोकोविच विम्बल्डन विजेता, जिंकले २१वे ग्रँडस्लॅम

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी होणाऱ्या सुनावणीत आपलाच विजय होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 'माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. सुनावणीचा जो काही निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण देशात लोकशाहीचे भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे, डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार कारभार होणार आहे का, हे सर्व या निकालामधून स्पष्ट होईल', असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. तर, 'न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही काहीही चुकीचे केले नाही. आम्हीच शिवसेना आहोत, हे लवकरच सिद्ध होईल', असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

विधिमंडळ सचिवांची सेना आमदारांना नोटीस

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या एकूण ५३ आमदारांना विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे. पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश भागवत यांनी दिले आहेत. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्ष निवड आणि विश्वासदर्शक ठरावासाठी एकमेकांच्या गटातील आमदारांना व्हिप बजावला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी