Bhushan Desai : सुभाष देसाईंचे कुल'भूषण' एकनाथ शिंदेंच्या छत्रछायेत, शिवसेनेत प्रवेश

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Mar 14, 2023 | 09:08 IST

maharashtra political happening subhash desai son bhushan desai join shinde camp big shock to thackeray camp : उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई याने एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. भूषण सुभाष देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

subhash desai son bhushan desai join shinde camp
भूषण सुभाष देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सुभाष देसाईंचे कुल'भूषण' एकनाथ शिंदेंच्या छत्रछायेत, शिवसेनेत प्रवेश
  • भूषण सुभाष देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला
  • एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ

maharashtra political happening subhash desai son bhushan desai join shinde camp big shock to thackeray camp : उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई याने एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. भूषण सुभाष देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत आज (सोमवार 13 मार्च 2023) संध्याकाळी झालेल्या एका कार्यक्रमात भूषण देसाई यांचा शिवसेना प्रवेश झाला. 

सुभाष देसाई हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला आहे. याआधी सप्टेंबर 2022 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक आणि सर्वात विश्वासू चंपासिंह थापा यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा हाती देऊन चंपासिंह थापा यांचे स्वागत केले होते. जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्य तसेच मोठ्या संख्येने खासदार, आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत म्हणून शिवसैनिक आमच्यासोबत आहेत, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. शिंदेंना भूषण देसाईंची साथ मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला राजकारणासोबतच भावनिक मुद्यांवरही सातत्याने धक्के मिळत असल्याचे चित्र आहे.

Onion Farmers: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान

बीड - धक्कादायक! परळीत 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा लावला बालविवाह

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी