Maharashtra Politics news updates: महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर तिन्ही पक्षांत जागा वाटपाचा फॉर्म्युलाही जवळपास निश्तिच झाल्याचं वृत्त गुरुवारी (16 मार्च 2023) सकाळच्या सुमारास आलं. मात्र, आता या फॉर्म्युल्याच्या संदर्भात नवी अपडेट समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 48 जागांपैकी 21 जागांवर उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस 8 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली. मात्र, या वृत्तावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.
हे पण वाचा : उन्हाळ्यात या फुलाचे पाणी तुमच्यासाठी ठरेल संजीवनी
काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी या फॉर्म्युल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. अतुल लोंढे यांनी म्हटलं की, असा कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये. महाविकास आघाडीचे नेते, जिल्हाध्यक्ष यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत आगामी निवडणुका एकत्रित लढण्याच्या संदर्भातील निर्णय झाला. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नाहीये. जे वृत्त येत आहे त्यात कोणतंही तथ्य नाहीये.
गुरुवारी सकाळच्या सुमारास वृत्त समोर आलं की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा करुन लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यासंदर्भात जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा निश्चित करण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार, सर्वाधिक जागा या उद्धव ठाकरे गटाला मिळाल्याचं दिसत आहे. शिवसेनेत झालेली फूट आणि खासदार, आमदार, नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची सोडलेली साथ यामुळे ठाकरेंची ताकद पूर्वी सारखी राहिलेली नाहीये. अशा स्थितीत उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक जागा देणं हे अनेकांना पटत नसल्याची माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा : व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 48 जागांपैकी 21 जागांवर उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 19 जागा लढवणार आहे तर काँग्रेस 8 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात काँग्रेसचा एकच खासदार आहे त्यामुळे जास्तित जास्त जागा काँग्रेसला देता येतील का याबाबतही चर्चा सुरू आहे. तसेच पाच ते सहा अशा जागा आहेत ज्याबाबत अद्याप एकमत होत नसल्याचं बोललं जात असून त्याबाबतही चर्चा सुरू आहेत.
हे पण वाचा : हाता-पायाला मुंग्या येतात? जाणून घ्या घरगुती आणि रामबाण उपाय
उद्धव ठाकरे गट - 21
राष्ट्रवादी काँग्रेस - 19
काँग्रेस 8
मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांपैकीं 4 जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.