मराठी तरुणांना नोकरीची संधी, पोस्टात तब्बल ३६५० पदांसाठी मेगाभरती, शिक्षण केवळ १०वी पास

मुंबई
Updated Nov 02, 2019 | 14:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra Post Office Recruitment, GDS bharati: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना पोस्टात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलने तब्बल ३६५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

maharashtra post office recruitment 2019 gramin dak sevak bharati apply online at indiapostgdsonline.in
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

 • तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी
 • पोस्टात ३६५० जागांसाठी भरती
 • राज्यातील विविध पोस्टल सर्कलमध्ये होणार भरती
 • शिक्षण केवळ १०वी पास
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९

मुंबई: राज्यातील मराठमोळ्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये तब्बल ३६५० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १०वी पास इतकीच आहे. जाणून घेऊयात या भरती प्रक्रिये संदर्भात अधिक माहिती.

पदाचे नाव 

ग्रामीण डाक सेवक 

पदांची संख्या 

३६५० 

अर्ज भरण्याची शेवटची तारीख

३० नोव्हेंबर २०१९ 

वयोमर्यादा 

 1. अर्जदार उमेदवाराचं वय कमीत कमी १८ वर्षे आणि अधिकाधिक ४० वर्षांच्या दरम्यान असावं
 2. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल
 3. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल 

शैक्षणिक अर्हता 

 1. इच्छुक आणि पात्र उमेदवार हा १०वी पास असावा
 2. कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक
 3. अर्जदाराला स्थानिक भाषा (मराठी) चं ज्ञान आवश्यक आहे

पगार 

१०,००० ते १४,५०० रुपये

परीक्षा फी 

सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी १०० रुपये इतकी आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी द्यावी लागणार नाहीये.

अर्ज करण्याची प्रक्रिया - 

इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज सादर करावा. त्यासाठी उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज https://indiapost.gov.in किंवा http://appost.in/gdsonline या वेबसाईटवर आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जापूर्वी उमेदवाराला नाव नोंदणी करावं लागणार आहे. अर्ज नोंदणीची तारीख १ नोव्हेंबर २०१९ पासून ते ३० नोव्हेबंर २०१९ पर्यंत असणार आहे. 

उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन संपूर्ण वाचून घ्यावं. त्यानंतरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी