Maharashtra Rain: राज्यात पावसाचं थैमान; १ जूनपासून आतापर्यंत ७६ जणांचा बळी तर ४९१६ जणांचं स्थलांतर

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 10, 2022 | 18:31 IST

Maharashtra Rain updates: राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्यस्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्याच दरम्यान आता महिन्याभरात राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या संदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पूरसदृश्यस्थिती
  • १ जूनपासून आतापर्यंत राज्यभरात झालेल्या विविध घटनांत ७६ जणांचा मृत्यू

मुंबई : गेल्या १० ते १५ दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस (heavy rain fall) पडत आहे. संपूर्ण जून महिन्यात पावसाचा लपंडाव सुरू होता. त्यानतंर जून महिन्याच्या अखेरपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाले ओसंडून वाहू लागले. तर धरणांतील पाण्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे. तर मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यांत पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली. पावसामुळे राज्यात घडलेल्या विविध घटनांच्या संदर्भातील आकडेवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केली आहे.  (76 people died due to rain in Maharashtra since June 1 said State Disaster Management Department)

७६ जणांचा मृत्यू

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १ जून पासून आतापर्यंत झालेल्या विविध घटनांत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत मुसळधार पावसामुळे राज्यभरातील विविध ठिकाणी एकूण ८३८ घरांचे नुकसान झाले आहे. तर ४९१६ हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 

११ जुलै 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : "काम असेल तर फोन लावायला सांगतो, कॅमेरा सुरू करायला नाही" मुख्यमंत्री शिंदेंच्या व्हिडिओवरुन अजितदादांचा टोला

१२ जुलै

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

विदर्भ - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी