Maharashtra RS Polls 2022: राज ठाकरेंचा एकमेव आमदार राज्यसभेसाठी कोणाला करणार मतदान, झाला फैसला

Raj Thackeray Stand on Rajya Sabha Election । भाजपा आणि मनसेने राज्यसभेच्या निवडणूकीसाठी हातमिळवणी केली आहे. आमदार राजू पाटील भाजपा उमेदवारासाठी मतदान करणार आहेत.

maharashtra rs polls 2022 raj thackeray mns only one mla raju patil will cast his vote for bjp in rs polls say Ashish shelar
राज ठाकरेंचा एकमेव आमदार राज्यसभेसाठी यांना करणार मतदान 

Ashish Shelar meet Raj Thackeray Stand on Rajya Sabha Election ।  मुंबई :  महाराष्ट्रात येत्या 10 जून दिवशी राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे सहाव्या जागेसाठी शिवसेना विरूद्ध भाजपा अशी लढत होणार आहे आणि आपलाच उमेदवार जिंकून यावा यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. या निवडणूकीत सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी कडून अपक्ष आणि छोट्या पक्षांची मनधरणी सुरू आहे. यात मनसेचा विधानसभेत एकमेव आमदार आहे. त्या आमदाराचे मत कोणाला मिळणार यावर उत्सुकता होती. एकतर मनसेच तटस्थ राहिल किंवा गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्त्वावरून जुळलेले सूर पाहता भाजपला मत देईल असे वाटत होते. आज झालेही तसे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी थेट दिल्ली भेटीनंतर राज ठाकरे यांचे शिवतिर्थ निवासस्थान गाठले आणि एकमेव आमदाराचा पाठिंबा मिळाल्याचा दावा नंतर पत्रकारांशी बोलतानाही केला.  (maharashtra rs polls 2022 raj thackeray mns only one mla raju patil will cast his vote for bjp in rs polls say Ashish shelar)

मनसेचा एकमेव आमदाराने भाजपच्याबाजुने मतदान करावे, ही विनंती घेऊन भाजपाकडून आशिष शेलार (Ashish Shelar) आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीला गेले होते. दरम्यान भाजपा आणि मनसेने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हातमिळवणी केली असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. 

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यात भेटीत राज्यसभेच्या जागेसाठी मनसेच्या एकमेव आमदारांने भाजपच्या पारड्यात मत टाकावे अशी विनंती केली. त्यावर राज ठाकरे यांनी मनसेचे कल्याणचे आमदार राजू पाटील यांना बोलावून घेतले आणि त्यांना भाजपला मतदान करण्याच्या सूचना दिल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. 

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील भाजपाच्या बाजूने मतदान करणार आहेत. आशिष शेलार यांनी राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीनंतर मीडीयाशी बोलताना त्याची माहिती दिली आहे. दरम्यान राजू पाटील हे कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत. त्यांचे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत 36 चा आकडा असल्याने राज्यसभेच्या खासदारकीसाठी राजू पाटील कोणाला मत देणार याची उत्सुकता होती पण आज मनसेचा हा एकमेव आमदार भाजपाच्या बाजूने जाणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. 

मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा नेते यांच्या गाठीभेटी वाढत होत्या त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष हातमिळवणी करणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरूच होती. राज ठाकरे देखील मागील सभांमध्ये महाविकास आघाडीवर टीकेचे बाण सोडताना दिसत आहेत. तर भाजपचा अजेंडा पुढे नेताना दिसत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी